
कर्णधारावर संघाची सर्वस्व जबाबदारी असते. संघाच्या विजय आणि पराभवासाठी कर्णधाराला जबाबदार ठरवलं जातं. कर्णधारावर नेतृत्वासह चांगली बॅटिंग अथवा बॉलिंगने योगदान देण्याचं दुहेरी आव्हान असतं. ऑस्ट्रेलियाच्या एश्ले गार्डनर हीने वूमन्स बिग बॅश लीगमध्ये अप्रतिम कामगिरी करत आपल्या नेतृत्वात संघाला विजयी केलं. एश्लेचा हा कर्णधार म्हणून पहिलाच सामना होता. (Photo Credit : Getty Images)

वूमन्स बिग बॅश लीग 2025 या हंगामाची रविवार 9 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली. सिडनी सिक्सर्स कर्णधारपदी एश्ले गार्डनरची नियुक्ती केली. एश्लेने आपल्या नेतृत्वात संघाला मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात विजयही मिळवून दिला. (Photo Credit : Getty Images)

एश्लेने बॉलिंगने जबरदस्त कामगिरी केली. एश्लेने प्रतिस्पर्धी पर्थ स्कॉचर्सच्या 5 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. एश्लेने 4 ओव्हरमध्ये अवघ्या 15 धावांच्या मोबदल्यात 5 विकेट्स घेतल्या. एश्लेच्या या योगदानामुळे पर्थ स्कॉचर्सचा डाव हा 109 धावांवर आटोपला. (Photo Credit : Getty Images)

त्यानंतर सिडनी सिक्सर्सने हे आव्हान 77 बॉलमध्ये पूर्ण करत विजयी सलामी दिली. सिडनीला विजयी करण्यात एलिसा पेरी आणि सोफिया डंकली या जोडीने सर्वाधिक योगदान दिलं. या सलामी जोडीने 12.5 ओव्हरमध्ये 112 रन्स केल्या आणि संघाला विजयी केलं. एलिसाने 47 तर सोफियाने 61 धावांचं योगदान दिलं. (Photo Credit : Getty Images)

एश्लेने नुक्त्याच झालेल्या वनडे वर्ल्ड कप स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली. गार्डनरने या स्पर्धेत 2 शतकांसह 328 धावा केल्या. तसेच 7 विकेट्सही मिळवल्या. (Photo Credit: PTI)