“टीम इंडिया अहंकारी”, Wtc Final 2023 मधील पराभवानंतर हल्लाबोल
WTC Final 2023 | टीम इंडिया घमंडी आहे, अशा शब्दात रोहितसेनेवर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमधील पराभवानंतर जोरदार टीका केली आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियावर टीका होत आहे. टीम इंडियाच्या कामगिरीवरुन अनेक प्रश्नचिन्ह उपस्थिक करण्यात आले. काहींनी बॅटिंगकडे बोट दाखवलं तर कोणी बॉलिंग कमी पडल्याचं म्हटलं. आता वेस्टइंडिजचा माजी वेगवान गोलंदाज एंडी रॉबर्ट्स याने टीम इंडियावर हल्लाबोल केला आहे.

एंडीने दिलेल्या मुलाखतीत टीम इंडियाला अहंकारी म्हटलं. रॉबर्ट्सनुसार, टीम इंडियाने अन्य संघांना गृहीत धरलं. टीम इंडियाने प्राथमिकता ठरवायला हवी, असं रॉबर्ट्सने म्हटलं. टीम इंडियाने ठरवायलं हवं की टेस्ट क्रिकेट खेळायचं की वनडे क्रिकेट,असंही रॉबर्ट्सने स्पष्ट केलं.

रॉबर्ट्सनुसार, टीम इंडियाच्या फलंदाजांनी निराशा केली. अंतिम सामन्यात अजिंक्य रहाणे याच्याशिवाय इतर कोणालाही आपली छाप सोडता आली नाही. शुबमन गिल याने चांगली कामगिरी केली. मात्र गिलच्या टेक्निकमध्ये उणिवा असल्याचंही रॉबर्ट्सने म्हटलं.

टीम इंडियाकडे निश्चितच चांगले खेळाडू आहेत. मात्र टीम इंडियाच्या खेळाडूंना परदेशात चांगली कामगिरी करणयात अपयश येत आहे. हीच टीम इंडियाची कमजोरी असल्याचं रॉबर्ट्सने नमूद केलं.

टीम इंडियाला सलग दुसऱ्यांदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलमध्ये पराभूत व्हावं लागलं. टीम इंडियाला 2013 पासून एकदाही आयसीसी ट्रॉफी जिंकता आलेली नाही.