IPL 2026: आयपीएल स्पर्धेत षटकारांच्या यादीत कोणता संघ अव्वल? जाणून घ्या प्रत्येक संघाची स्थिती
आयपीएल 2026 स्पर्धेत रचल्या गेलेल्या विक्रमांची चर्चा होत आहे. मागच्या काही पर्वातील काही विक्रम मोडीत निघाले आहेत. यंदा षटकारांची संख्या पाहता आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडीत निघाले आहेत. चला जाणून घेऊयात दहा संघांची षटकारांची यादी..

आयपीएल 2026 स्पर्धेत षटकारांचा वर्षावर झाला आहे. मागच्या पर्वाच्या तुलनेत यंदा सर्वाधिक षटकार मारले गेले आहेत. आयपीएल 2026 स्पर्धेदरम्यान सर्वाधिक षटकार कोणत्या संघांच्या फलंदाजांनी मारले आहेत. (Photo: PTI)

आयपीएल 2026 स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या फलंदाजांचा बोलबाला आहे. आयपीएल 2026 स्पर्धेच्या 46व्या सामन्यापर्यंत सनरायझर्स हैदराबादने सर्वाधिक 118 षटकार मारले. दहा सामन्यात 19 फलंदाजांनी इतके षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

दुसऱ्या क्रमांकावर पंजाब किंग्स असून 15 फलंदाजांनी 9 सामन्यात 108 षटकार मारले आहेत. राजस्थान रॉयल्स तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान रॉयल्सच्या 17 फलंदाजांनी 10 सामन्यात 100 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

गतविजेत्या आरसीबी संघाने 9 सामन्यात 97 षटकार मारले आहेत. मुंबई इंडियन्सने 9 सामन्यात 83 षटकार, तर दिल्ली कॅपिटल्सने 9 सामन्यात 71 षटकार मारले आहेत. (Photo: PTI)

चेन्नई सुपर किंग्सने 70 षटकार, गुजरात टायटन्सने 69 षटकार, कोलकाता नाईट रायडर्सने 62 षटकार आणि लखनौ सुपर जायंट्सने 55 षटकार मारले आहेत. गुजरात टायटन्स षटकारांच्या य़ादीत खाली असला तरी चांगली कामगिरी करत आहे. (Photo: PTI)