
वेस्ट इंडिज विरुद्धचा दुसरा कसोटी सामना हा टीम इंडियाच्या विराट कोहली याच्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीतील 500 वा सामना ठरला. त्यामुळे विराटची चर्चा आहे. मात्र या दरम्यान कॅप्टन रोहित शर्मा याने रेकॉर्ड केलाय.

रोहितने वनडे आणि कसोटीत ओपनर म्हणून 2 हजार धावांनंतरही कमालीचं सातत्य राखत 50 पेक्षा अधिकचा एव्हरेज ठेवलाय. रोहितने कसोटीत सलामीवीर फलंदाज म्हणून 53.55 आणि वनडेत ओपनर म्हणून 55.76 चा एव्हरेज आहे.

रोहितने विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीत ओपनर म्हणून 2 हजार धआवा पूर्ण केल्या आहेत. रोहित टेस्ट क्रिकेटमध्ये सर्वाधिक सरासरीने धावा करणारा भारतीय फलंदाज आहे. रोहितनंतर सुनील गावसकर यांचा नंबर लागतो, ज्यांनी 50.29 च्या सरासरीने धावा केल्यात.

रोहित शर्मा विंडिज विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात शर्मा शतक ठोकण्यात अपयशी ठरला. रोहितने 143 बॉलमध्ये 9 चौकार आणि 2 सिक्सच्या मदतीने 80 धावा केल्या.

रोहितने यासह माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला मागे टाकलं. रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक धावा करणारा पाचवा फलंदाज ठरला. रोहितच्या नावावर आता 443 सामन्यांमध्ये 17 हजार 298 धावा केल्या आहेत. तर धोनीने 538 मॅचमध्ये 17 हजार 266 रन्स केल्या आहेत.