
चेक प्रजासत्ताकच्या मार्केटा वोंड्रोसोवा हिने विम्बल्डन 2023 मध्ये महिला एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे.

अंतिम सामन्यात वोंड्रोसोवाने ट्युनिशियाच्या ओन्स जेब्युरचा 6-4, 6-4 असा पराभव केला.

बिगरमानांकित वोंद्रोसोवाच्या कारकिर्दीतील हे पहिले ग्रँडस्लॅम जेतेपद आहे.

दोन्ही खेळाडूंमधील हा सामना एक तास 20 मिनिटे चालला. 24 वर्षीय मार्केटा वोंड्रोसोवा ही विम्बल्डन जेतेपद जिंकणारी बिगरमानांकित महिला खेळाडू ठरली.

यापूर्वी 1963 मध्ये बिगरमानांकित बिली जीन किंगने अंतिम फेरीत धडक मारली होती. पण तिचा ऑस्ट्रेलियन खेळाडू मार्गारेट कोर्टकडून पराभव झाला होता. (सर्व फोटो- विम्बलडन ट्विटर)