WPL 2026: महिला प्रीमियर लीग या दोन शहरांमध्ये होणार! जाणून घ्या

वुमन्स प्रीमीयर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाचे वेध लागले आहेत. या स्पर्धेची तीन पर्व यशस्वीरित्या पार पडली आहे. यंदा भारताने वनडे वर्ल्डकप जिंकल्यानंतर वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं महत्त्व आणखी वाढलं आहे. या लीगबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Updated on: Nov 18, 2025 | 5:29 PM
1 / 5
वुमन्स प्रीमियर लीग 2026 अर्थाच स्पर्धेचं चौथं पर्व दोन शहरांमध्ये आयोजित करण्याचा विचार केला जात आहे. वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा मुंबई आणि बडोद्यात होण्याची शक्यता आहे. आगामी टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी वुमन्स प्रीमियर लीग पूर्ण करण्याची जबाबदारी बीसीसीआयवर आहे.  (फोटो- BCCI)

2 / 5
भारत आणि श्रीलंका मेन्स 2026 टी20 वर्ल्डकप स्पर्धेचं आयोजन करणार आहे. ही स्पर्धा 7 फेब्रुवारीपासून होणार आहे. या स्पर्धेपूर्वी भारतीय क्रिकेट बोर्डाला वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा पार पाडावी लागणार आहे.  (Photo- Pankaj Nangia/Getty Images)

3 / 5
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धा 7 जानेवारी 2026 पासून सुरु होईल. तसेच अंतिम सामना 3 फेब्रुवारीला होणार आहे. जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यात ही स्पर्धा सुरु होणार हे जवळपास निश्चित झालं आहे. त्यावर अंतिम मोहोर लवकरच लावली जाईल.  (Photo: PTI)

4 / 5
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेचं चौथं पर्व असून यंदा मेगा लिलाव पार पडणार आहे. फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी आधीच जाहीर केली आहे. त्यानंतर उर्वरित खेळाडूंसाठी 27 नोव्हेंबरला दिल्लीत बोली लागणार आहे.  (Photo: X/WPL/TV9 Hindi वरून)

5 / 5
वुमन्स प्रीमियर लीग मेगा लिलावासाठी फक्त 73 खेळाडू पात्र असणार आहेत. सर्व फ्रेंचायझींनी स्टार खेळाडू कायम ठेवल्याने 73 जागा रिक्त आहेत. या जागांसाठी 27 नोव्हेंबरला बोली लावतील. यात कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागते याकडे लक्ष असेल.  (Photo: PTI)