
कर्णधार मिताली राजने आणखी एका विश्वविक्रमावर आपल्या नाववर कोरलाय. मात्र, या वेळी तिने बरोबरी साधली आहे. हा विश्वविक्रम महिला विश्वचषकातील सर्वोच्च पन्नास प्लस स्कोअरशी संबंधित आहे. मिताली राजने आयसीसी महिला विश्वचषक 2022मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अर्धशतक झळकावून हे यश झळकावलंय.

मितालीनं ऑस्ट्रेलियाविरुद्ध 96 चेंडूत 4 चौकार आणि 1 षटकारासह 68 धावा केल्या आहेत. चालू विश्वचषकातील तिचे हे पहिलेच अर्धशतक आहे. महिला विश्वचषकाच्या इतिहासातील हा 12वा पन्नास प्लस स्कोअर आहे.

तालीने आयसीसी महिला विश्वचषकातील 12 पन्नास धावांच्या विक्रमाची बरोबरी केली. हा विक्रम यापूर्वी न्यूझीलंडच्या डर्बी हॉकलीच्या नावावर होता. त्याने 12 पन्नास प्लस स्कोअरही केले.

मिताली आणि हॉकलीनंतर इंग्लंडची सी. एडवर्ड्स आहे, ज्याने महिला विश्वचषकात 11 फिफ्टी प्लस स्कोअर केले आहेत. तिच्यापाठोपाठ ऑस्ट्रेलियाच्या कॅरेन रोल्टनचा क्रमांक लागतो, जिने 9 फिफ्टी प्लस स्कोअर केले आहेत. तर न्यूझीलंडची सुझी बेट्स ८ फिफ्टी प्लस स्कोअरसह पाचव्या क्रमांकावर आहे.

संघाला गरज असताना मिताली राजने दमदार खेळ दाखवला आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात तिने अर्धशतकी खेळी केली. वर्ल्ड कप सुरु झाल्यापासून तिचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु होता. मिताली राजचे हे 63 वे अर्धशतक आहे.