WPL 2026 : मेगा लिलावात फ्रेंचायझी किती खेळाडू खरेदी करू शकते? जाणून घ्या

वुमन्स प्रीमियर लीग 2026 स्पर्धेपूर्वी पाचही फ्रेंचायझींनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. प्रत्येक संघाला जास्तीत जास्त 18 खेळाडू घेण्याची परवानगी आहे. यात 6 विदेशी खेळाडूंना परवानगी असणार आहे. म्हणजेत 12 भारतीय आणि 6 विदेशी खेळाडू निवडले जाऊ शकतात.

| Updated on: Nov 08, 2025 | 9:02 PM
1 / 6
वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या चौथ्या पर्वाची जोरदार तयारी सुरु आहे. प्रत्येक फ्रेंचायझी या स्पर्धेसाठी मोर्चेबांधणी करत आहे. खेळाडूंची जुळवाजुळव सुरु झाली आहे. इतकंच काय बजेट आणि खेळाडूंचा तालमेल बसवला जात आहे. चला जाणून घेऊयात फ्रेंचायझी किती खेळाडू खरेदी करू शकतात. (Photo: X)

2 / 6
गतविजेत्या मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने एकूण पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता 5.75 कोटी जवळ शिल्लक आहेत. मुंबई इंडियन्स फ्रँचायझीला या पैशात लिलावाद्वारे एकूण 13 खेळाडू खरेदी करू शकतात. (Photo : PTI)

3 / 6
दिल्ली कॅपिटल्स: गेल्या वर्षीच्या उपविजेत्या दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझीनेही पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे. आता 5.70 कोटी रुपयांच्या खर्चासह, दिल्ली कॅपिटल्स फ्रँचायझी लिलावाद्वारे एकूण 13 खेळाडू खरेदी करू शकते. (फोटो- Pankaj Nangia/Getty Images)

4 / 6
गुजरात जायंट्स: गुजरात जायंट्स फ्रँचायझीने यावेळी फक्त दोन खेळाडूंना कायम ठेवले आहे. 9 कोटी रुपयांची शिल्लक असलेल्या गुजरात जायंट्स फ्रँचायझी मेगा लिलावाद्वारे एकूण 16 खेळाडू खरेदी करू शकते.  (Photo: X/WPL)

5 / 6
यूपी वॉरियर्स: उत्तर प्रदेश वॉरियर्स फ्रँचायझीने फक्त एकाच खेळाडूला कायम ठेवले आहे. आता 14.5  कोटी रुपये शिल्लक असून यूपी वॉरियर्स मेगा लिलावाद्वारे एकूण 17 खेळाडू खरेदी करू शकते. (फोटो- PTI)

6 / 6
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू: आरसीबी फ्रँचायझीने यावेळी संघात चार खेळाडू कायम ठेवले आहेत. त्यानुसार, 6.15 कोटी रुपये शिल्लक असून रॉयल्स  चॅलेंजर्स बंगळुरू एकूण 14 खेळाडू खरेदी करू शकते. (Photo : PTI)