RCB vs DC Final: दिल्लीचा फायनलमध्ये धमाका, कॅप्टन जेमिमाह रॉड्रिग्सचं विक्रमी अर्धशतक, आरसीबी विरुद्ध काय केलं?
RCB vs DC WPL 2026 Final: दिल्ली कॅपिट्ल्स टीमने वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेच्या आपल्या चौथ्या अंतिम सामन्यात खेळताना मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. तसेच कॅप्टन म्हणून जेमिमाह रॉड्रिग्स हीने ऐतिहासिक कामगिरी केलीय.

दिल्ली कॅपिट्ल्सने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या चौथ्या मोसमातील अंतिम सामन्यात मोठी धावसंख्या उभारली. दिल्लीने आरसीबी विरुद्ध 203 धावा केल्या. दिल्लीने यासह या स्पर्धेच्या इतिहासात ऐतिहासिक कामगिरी केली. (Photo Credit : PTI)

दिल्लीने आरसीबी विरुद्ध 4 विकेट्स गमावून 20 ओव्हरमध्ये 203 धावा केल्या. दिल्लीची या स्पर्धेत अंतिम फेरीत खेळण्याची सलग आणि एकूण चौथी वेळ आहे. मात्र दिल्ली पहिल्यांदाच अंतिम फेरीत 150 पार पोहचण्यात यशस्वी ठरली. (Photo Credit : PTI)

दिल्लीने यासह वूमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत मोठा विक्रम आपल्या नावावर केला. दिल्ली या स्पर्धेत अंतिम फेरीत सर्वात मोठी धावसंख्या उभारणारा संघ ठरला. तसेच दिल्ली अंतिम फेरीत 200 धावा करणारी पहिलीच टीम ठरली. (Photo Credit : PTI)

जेमिमाह रॉड्रिग्स हीने या अंतिम सामन्यात कर्णधारपदाला साजेशी खेळी केली. जेमीने 37 चेंडूत 57 धावा केल्या. जेमीने या दरम्यान 32 चेंडूत अर्धशतक झळकावलं. जेमी यासह डब्ल्यूपीएल स्पर्धेतील अंतिम फेरीत वेगवान अर्धशतक करणारी पहिली फलंदाज ठरली. (Photo Credit : PTI)

जेमिमाहनंतर लॉरा वॉल्वॉर्ड्ट आणि चिनेल हेन्री या दोघींनी तोडफोड बॅटिंग केली. लॉराने 44 धावा केल्या. तर चिनेल हेन्री हीने अवघ्या 15 चेंडूत 35 धावा ठोकल्या. (Photo Credit : PTI)