WTC 2023 Final Ind vs Aus : टेस्ट क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा सिक्सर किंग कोण? जाणून घ्या

| Updated on: Jun 06, 2023 | 4:17 PM

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे. या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचा विक्रम मोडण्याची नामी संधी रोहित शर्माकडे आहे. चला जाणून घेऊयात भारताचे कसोटीतील सिक्सर किंग...

1 / 7
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल 7 जूनपासून सुरू होईल. या सामन्यात रोहित शर्माने षटकार ठोकल्यास टीम इंडिया सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडू शकते.

2 / 7
टीम इंडियासाठी एकूण 329 कसोटी डाव खेळणाऱ्या सचिन तेंडुलकरने एकूण 69 षटकार ठोकले आहेत. सध्या 83 डावात 69 षटकार मारणाऱ्या हिटमॅनला सचिनचा विक्रम मोडण्यासाठी फक्त एका षटकाराची गरज आहे. त्यामुळे ओव्हलच्या मैदानावर रोहित शर्माकडून एका खास विक्रमाची अपेक्षा केली जाऊ शकते.

3 / 7
टीम इंडियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम विरेंद्र सेहवागच्या नावावर आहे. सेहवागने एकूण 180 कसोटी डावात 91 षटकार मारून विक्रम केला आहे.

4 / 7
महेंद्रसिंग धोनी या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. धोनीने 144 कसोटी डावांमध्ये एकूण 78 षटकार मारले आहेत.

5 / 7
या यादीत 329 कसोटी डावात 69 षटकार ठोकणारा सचिन तेंडुलकर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

6 / 7
चौथ्या क्रमांकावर रोहित शर्मा आहे. हिटमॅनने 83 डावात 69 षटकार ठोकले आहेत.

7 / 7
184 कसोटी डावात 61 षटकार ठोकणारा टीम इंडियाचा माजी कर्णधार कपिल देव या यादीत पाचव्या स्थानावर आहे.