फक्त 10 धावांनी यशस्वी जयस्वालचा मोठा विक्रम हुकला, राहुल द्रविडचा विक्रम अबाधित

भारताने पहिल्या कसोटी गमावला असला तरी दुसऱ्या कसोटी सामन्यात चांगली सुरुवात केली आहे. यशस्वी जयस्वालने या सामन्यात 107 चेंडूंचा सामना केला आणि 13 चौकारांसह 87 धावा केल्या. त्याचं शतकं फक्त 13 धावांनी हुकलं. तसेच द्रविडचा मोठा विक्रम मोडण्याची संधी हुकली.

| Updated on: Jul 03, 2025 | 4:05 PM
1 / 5
बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन स्टेडियमवर इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात यशस्वी जयस्वालने दमदार खेळी केली. हेडिंग्ले कसोटीत शतक झळकावणारा जयस्वाल एजबॅस्टन येथे 87 धावांवर बाद झाला. त्याचं दुसरे शतक अवघ्या 13 धावांनी हुकले.

2 / 5
दुसरीकडे, टीम इंडियासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2 हजार धावांचा विक्रम मोडण्याची संधीही गमावली. जर त्याने इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या डावात 97 धावा केल्या असत्या तर त्याने भारतासाठी सर्वात जलद 2000 धावा पूर्ण करणाऱ्या फलंदाजाचा विक्रम केला असता.

3 / 5
कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम हा राहुल द्रविडच्या नावावर आहे. त्याने 40 डावात 2 हजार धावा पूर्ण केल्या आहेत. यासह भारताकडून सर्वात जलद धावा करणारा फलंदाज ठरला आहे.

4 / 5
यशस्वी जयस्वालने 87 धावा काढून बाद झाला आणि अव्वल स्थानावर पोहोचण्याची संधी गमावली. बेन स्टोक्सच्या गोलंदाजीवर बाहेरच्या चेंडूवर फटका मारताना चुकला आणि जेमी स्मिथच्या हाती झेल देऊन बाद झाला. पुढच्या डावात राहुल द्रविडच्या विक्रमाची बरोबरी करू शकतो.

5 / 5
टीम इंडियासाठी आतापर्यंत 21 कसोटी सामने खेळणारा यशस्वी जयस्वालने 39 डावांमध्ये 1990 धावा केल्या आहेत. पुढच्या डावात आणखी 10 धावा केल्या तर तो भारतासाठी कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या राहुल द्रविडच्या विक्रमाशी बरोबरी करू शकतो. (सर्व फोटो- टीव्ही नेटवर्क/कन्नडवरून)