
दक्षिण अफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका गमावल्यानंतर टीम इंडियाने वनडे मालिकेत लाज राखली. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली. आता भारतीय संघ टी20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 9 डिसेंबरपासून या मालिकेला सुरुवात होणार आहे. पण या मालिकेसाठी यशस्वी जयस्वालची संघात निवड झालेली नाही. (Photo-BCCI Cricket Twitter)

वनडे मालिकेतील शेवटच्या सामन्यात यशस्वी जयस्वालने नाबाद 116 धावा केल्या होत्या. यात 12 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. रोहित शर्मासोबत 155 आणि विराट कोहलीसोबत 116 धावांची भागीदारी केली होती. या खेळीसह टीम इंडियाला तिसऱ्या सामन्यात सहज विजय मिळवून दिला होता. (Photo-BCCI Cricket Twitter)

वनडे मालिकेनंतर आता यशस्वी जयस्वाल टी20 स्पर्धेसाठी सज्ज झाला आहे. दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी त्याची निवड झाली नाही. त्यामुळे आता सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीत खेळणार आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यशस्वीने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत खेळण्यास होकार दिला आहे. (Photo-BCCI Cricket Twitter)

मुंबईचा संघ या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचला आहे. या सामन्यात यशस्वी जयस्वाल खेळण्याची शक्यता वाढली आहे. यशस्वी जयस्वालने शतकी खेळी करत फॉर्म दाखवून दिला आहे. त्यामुळे मुंबई संघाला यशस्वी जयस्वाल आल्याने बळ मिळणार आहे. (Photo-BCCI Cricket Twitter)

यशस्वी जयस्वालला आक्रमक खेळी करून टी20 संघात जागा मिळत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. डावखुरा फलंदाज चांगली कामगिरी करत आहे. त्याने 22 टी20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 36.15 च्या सरासरीने 723 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राईक रेटही 165 च्या जवळ आहे. यात एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. (Photo-BCCI Cricket Twitter)