
आयसीसी वर्ल्ड कप क्वालिफायर 2023 स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेतील 17 व्या सामन्यात झिंबाब्बे विरुद्ध यूएई यांच्यात सामना पार पडला. या सामन्याचं आयोजन हे हरारे स्पोर्ट्स क्लबमध्ये करण्यात आलं होतं. या सामन्यात टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होता होता राहिला. झिंबाब्वेने वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच रेकॉर्ड 408 धावा केल्या.

अमेरिका 409 धावांचा पाठलाग करताना 104 धावांवर ऑलआऊट झाली. त्यामुळे झिंबाब्वेचा 304 धावांनी विजय झाला. झिंबाब्बेवला सर्वाधिक धावांच्या फरकाने जिंकण्याची संधी होती.

मात्र यूएसचा मराठमोळा फलंदाज अभिषेक पराडकर याच्या 24 धावांच्या खेळीमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड कायम राहिला. टीम इंडियाने जानेवारी 2023 मध्ये श्रीलंकेवर 317 धावांनी विजय मिळवला होता. झिंबाब्वेचा या पेक्षा जास्त धावंच्या अंतराने विजय झाला असता. मात्र पराडकरच्या खेळीमुळे टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक होऊ शकला नाही.

झिंबाब्वेचा कर्णधार सीन विलियमन्स याच्या 174 धावांच्या जोरावर झिंबाब्वेने पहिल्यांदा 400 पार मजल मारली. झिंबाब्वेलाल याआधी कधीच 400 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करता आल्या नव्हत्या.

झिंबाब्वे क्रिकेट टीम 1983 या वर्षापासून वनडे क्रिकेट खेळतेय. झिंब्बावेने याआधी 351 सर्वोच्च धावा केल्या आहेत. झिंबाब्वे टीमने ही कामगिरी 2009 मध्ये केनिया विरुद्ध केली होती. दरम्यान झिंबाब्वेने खेळळेल्या 4 पैकी 4 सामने जिंकले आहेत. झिंबाब्वे सुपर 6 मध्ये याआधीच पोहचली आहे.