क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं! 40शी पार केलेल्या दोन दिग्गजांनी मैदानात केली कमाल
झिम्बाब्वे आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले ती खेळाडू एकाच वेळी मैदानात उतरले होते. जिम्बाब्वेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणाऱ्या या तीन दिग्गजांपैकी दोन खेळाडूंनी मिळून एक अतिशय खास आणि ऐतिहासिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाची चाळीशी ओलांडलेले खेळाडू खूप कमी पाहायला मिळतात. मात्र, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात जिम्बाब्वेने चक्क 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 3 अनुभवी खेळाडूंना प्लेइंग 11 मध्ये स्थान देऊन सर्वांना थक्क केले. (Photo: Getty Images)
या ऐतिहासिक सामन्यात जिम्बाब्वेच्या प्लेइंग-11 मध्ये ब्रेंडन टेलर (40 वर्षे), सिकंदर रजा (40 वर्षे) आणि क्रेग इर्विन (41 वर्षे) या 3 खेळाडूंचा समावेश होता. (Photo: Getty Images)
या सामन्यात क्रेग इर्विन आणि सिकंदर रजा या दोघांनी अर्धशतके ठोकून एक अनोखा जागतिक विक्रम रचला. एकदिवसीय क्रिकेटच्या 150 वर्षांच्या इतिहासात 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन फलंदाजांनी एकाच सामन्यात अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. (Photo: Getty Images)
या सामन्यात क्रेग इर्विन आणि सिकंदर रजा या दोघांनी अर्धशतके ठोकून एक अनोखा जागतिक विक्रम रचला. एकदिवसीय क्रिकेटच्या 150 वर्षांच्या इतिहासात 40 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या दोन फलंदाजांनी एकाच सामन्यात अर्धशतके झळकावण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. (Photo: Getty Images)
295 धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना 40 वर्षीय सिकंदर रजाने 57 धावांची तर 41 वर्षीय क्रेग इर्विनने 59 धावांची झुंजार खेळी केली. या दोघांनी 98 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचली, पण तरीही झिम्बाब्वे संघाला 59 धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या या विजयाचा खरा शिल्पकार ठरला वेगवान गोलंदाज नाथन एलिस. त्याने या सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी करत 31 धावांत 5 बळी घेतले. (Photo: Getty Images)