AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रोहितशी पंगा पडला महाग? अजित आगरकरची गच्छंती नक्की? अध्यक्षपदासाठी दोन माजी खेळाडूंची नावे शर्यतीत

भारतीय पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत असून बीसीसीआय त्यांचा करार वाढवण्याच्या विचारात नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती यांच्यातील वादाची किनार असल्याचंही बोललं जात आहे.

रोहितशी पंगा पडला महाग? अजित आगरकरची गच्छंती नक्की? अध्यक्षपदासाठी दोन माजी खेळाडूंची नावे शर्यतीत
रोहितशी पंगा पडला महाग? अजित आगरकरची गच्छंती नक्की? अध्यक्षपदासाठी दोन माजी खेळाडूंची नावे शर्यतीतImage Credit source: PTI
| Updated on: Sep 17, 2026 | 4:52 PM
Share

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीमध्ये लवकरच मोठे फेरबदल होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकर यांचा कार्यकाळ आता संपत आला असून, बीसीसीआय त्यांचा करार वाढवण्याच्या विचारात नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आगरकर यांचा निवड समितीचे अध्यक्ष म्हणून असलेला करार याच महिन्यात संपत आहे. यापूर्वी क्रीडा वर्तुळात अशा चर्चा होत्या की, अजित आगरकर 2027 च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणून कायम राहू शकतात. मात्र, बीसीसीआयमधील एका मोठ्या गटाला असे वाटते की आगरकर यांचा कार्यकाळ आता जवळपास संपला आहे. बीसीसीआयची अत्यंत महत्त्वाची वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी पार पडणार असून या बैठकीत आगरकर यांच्या मुदतवाढीला मंजुरी मिळण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

अजित आगरकर यांनी त्यांच्या कार्यकाळातील शेवटचे काम म्हणून वेस्ट इंडिजविरुद्धच्या आगामी एकदिवसीय आणि टी20 मालिकेसाठी अंतिम संघ निवडला आहे. यानंतर, भारतीय संघ 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्ध पाच टी20, तीन एकदिवसीय आणि दोन कसोटी सामन्यांची मोठी मालिका खेळणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, या महत्त्वाच्या न्यूझीलंड दौऱ्यापूर्वीच भारताला नवीन मुख्य निवडकर्ता मिळण्याची दाट शक्यता आहे.

रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्यात बिनसलं?

ऑस्ट्रेलियन दौऱ्यादरम्यान जेव्हा माध्यम परिषदेत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या 2027 च्या विश्वचषक खेळण्याबाबत विचारण्यात आले, तेव्हा आगरकर यांनी ‘नॉन-कमिटल’ असा शब्दप्रयोग केला होता. हा मुद्दा रोहित शर्माला आवडला नसल्याचे बोलले जाते. नुकतेच रोहितने एका शोच्या टीझरमध्ये ‘Non-Committal’ लिहिलेली टी-शर्ट घालून आगरकर यांना टोला लगावल्याचीही चर्चा रंगली होती. त्यात रोहित शर्माची वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी निवडही झाली आहे. त्यामुळे अजित आगरकर आणि बीसीसीआय रोहित शर्माच्या मुद्द्यावरून आमनेसामने आल्याचं बोललं जात आहे.

पार्थिव पटेल आणि प्रज्ञान ओझा शर्यतीत आघाडीवर

एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, बीसीसीआयच्या वरिष्ठ पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य निवडकर्तापदी अजित आगरकर यांची जागा घेण्यासाठी दोन माजी भारतीय क्रिकेटपटूंची नावे सर्वात पुढे आहेत. माजी यष्टीरक्षक-फलंदाज पार्थिव पटेल आणि माजी फिरकीपटू प्रज्ञान ओझा हे या पदासाठी आघाडीवर आहेत. विशेष म्हणजे, प्रज्ञान ओझा हे सध्या आगरकर यांच्याच निवड समितीचा एक भाग आहेत, त्यामुळे त्यांना अंतर्गत प्रक्रियेचा अनुभव असल्याने या पदासाठी ते एक प्रबळ दावेदार मानले जात आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...