AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2026 : नवख्या थायलंडने पाकिस्ताला रडवले! शेवटच्या षटकात 2 चेंडू राखून कसाबसा विजय

एशियन गेम्स 2026 मधील सामन्यात पाकिस्तान महिला संघाने थायलंडवर 3 गड्यांनी थरारक विजय मिळवून उपांत्य फेरीत प्रवेश केला. पावसामुळे 11 षटकांच्या झालेल्या या सामन्यात थायलंडने दिलेल्या 92 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या फलंदाजांचा घाम निघाला.

Asian Games 2026 : नवख्या थायलंडने पाकिस्ताला रडवले! शेवटच्या षटकात 2 चेंडू राखून कसाबसा विजय
Asian Games 2026 : नवख्या थायलंडने पाकिस्ताला रडवले! शेवटच्या षटकात 2 चेंडू राखून कसाबसा विजयImage Credit source: PTI
| Updated on: Sep 17, 2026 | 5:17 PM
Share

एशियन गेम्स 2026 स्पर्धेत महिला क्रिकेटच्या दुसऱ्या उपांत्यपूर्व सामन्यात एक मोठा उलटफेर होता होता टळला. दोन वेळच्या माजी सुवर्णपदक विजेत्या पाकिस्तान महिला क्रिकेट संघाला नवख्या आणि दुबळ्या मानल्या जाणाऱ्या थायलंडविरुद्ध विजयासाठी नाकीनऊ आले होते. या सामन्यात पाकिस्तानने 2 चेंडू शिल्लक ठेवून थायलंडवर 3 गडी राखून कसाबसा थरारक विजय मिळवला. या विजयासह पाकिस्तानने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. पाऊस आणि ओल्या मैदानामुळे या सामन्यात षटकांची कपात करण्यात आली आणि सामना प्रत्येकी 11 षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना हिने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना थायलंडच्या महिला संघाने 11 षटकांत 4 बाद 91 धावांचा अनपेक्षित आणि आव्हानात्मक धावसंख्या उभारली आणि पाकिस्तानसमोर 11 षटकांत 92 धावांचे कठीण लक्ष्य ठेवले.

विजयी धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. मात्र, सलामीवीर शवाल झुल्फिकारने 14 चेंडूंत 25 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. त्यानंतर मधल्या फळीत कर्णधार फातिमा सानाने 13 चेंडूंत 21 धावांचे योगदान देत संघाचा डाव सावरला. या दोन फलंदाजांच्या खेळीमुळे पाकिस्तानला सामन्यात टिकून राहता आले. थायलंडच्या फिरकीपटूंनी अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी करत सामना शेवटच्या षटकापर्यंत खेचला. अंतिम षटकात पाकिस्तानला विजयासाठी अवघ्या ४ धावांची गरज होती, मात्र खेळपट्टीवर प्रचंड दडपण होते. थायलंडच्या गोलंदाजांनी कडवी झुंज दिली,

चार धावांची गरज असताना पहिल्या चेंडूवर इमान नसीरने एक धाव घेत स्ट्राईक उम्म-ए-हानीला दिली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर उम्म-ए-हानीने हुशारीने एक धाव चोरली. तिसऱ्या चेंडूवर पुन्हा इमान नसीरने एक धाव घेत धावसंख्या बरोबरीत आणली आणि अखेर चौथ्या चेंडूवर उम्म-ए-हानीने विजयी धाव घेत पाकिस्तानचा 3 गडी राखून थरारक विजय निश्चित केला.

या थरारक विजयासह पाकिस्तान महिला क्रिकेट संघाने एशियन गेम्स स्पर्धेच्या महिला क्रिकेट प्रकारात उपांत्य फेरीत पोहोचणारा पहिला संघ बनण्याचा बहुमान मिळवला आहे. जरी पाकिस्तानने सामना जिंकला असला, तरी थायलंडच्या महिला संघाने आपल्या अप्रतिम खेळोने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Follow Us
शिवसेना सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष...
Shivsena : आजच्या सुनावणीच्या अखेरीस कोर्टाची मोठी टिप्पणी, विधीमंडळ पक्ष चाचणीचे महत्त्व...
शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटी..
Shivsena Hearing Upadate : शिवसेना कुणाची? शिंदेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद; म्हणाले, फुटीनंतरही...
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणा..
हैदराबाद गॅझेटवर शिवेंद्रराजे भोसले यांचा मोठा खुलासा; मराठा आरक्षणासह शेतकरी मदतीबाबत काय म्हणाले?
जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं...
Bajrang Sonavane | जरांगेंच्या निर्णयाचे स्वागत, त्यांची समाजाला गरज, बजरंग सोनवणेंचं मोठं वक्तव्य
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या...
एकनाथ शिंदेंच्या हेलिकॉप्टरमध्ये अचानक तांत्रिक बिघाड, गुजरातच्या वडनगरहून रस्ते मार्गाने रवाना
शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन
Devendra Fadnavis | शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार ठाम, फडणवीसांचं मोठं आश्वासन; 5 ऑक्टोबरनंतर पंचनामे होणार
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात...
उद्धव ठाकरे गणेश महासंघ कार्यालयाच्या भेटीला, छत्रपती संभाजीनगरात मोठ्या हालचाली
उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा...
उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली संभाजीनगरमध्ये तुमसे ना हो पाएगा आंदोलनाचा समारोप
सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत
Nashik | सिद्धार्थ गोरे प्रकरणात जिंदाल कंपनी अडचणीत, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे प्रशासनाचे आदेश
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ; कैलास पाटील...
धाराशिवमध्ये मराठा आंदोलकांना ताब्यात घेतल्याने गोंधळ, ठाकरेंचे आमदार थेट...