तापाने फणफणत होती श्रीदेवी, रात्रभर एकाच… अशा अवस्थेत शूट झालं 90 च्या दशकातील सर्वात बोल्ड गाणं
हिंदी चित्रपटसृष्टीतील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांनी आपल्या अभिनयाने आणि नृत्याने प्रेक्षकांच्या मनावर वेगळीच छाप उमटवली. त्यांच्या अभिनयाची जादू आजही चाहत्यांच्या मनात तशीच कायम आहे. नुकतेच दिग्दर्शक शेखर कपूर यांनी श्रीदेवींच्या जयंतीनिमित्त माध्यमांसोबत खास बातचीत केली. यावेळी त्यांनी ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे काही खास किस्से सांगितले.

‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील ‘काटे नहीं कटते ये दिन ये रात’ या गाण्याच्या शूटिंगचा किस्सा त्यांनी सांगितला. श्रीदेवींना 104 ताप होता, तरीही त्यांनी पूर्ण डान्स शूट केला. शेखर कपूर म्हणाले, “ऐसे कितने लोग आते हैं जिनमें अपने काम के प्रति इतनी शिद्दत हो?”
या गाण्यातील निळ्या साडीतील श्रीदेवींचा डान्स प्रचंड लोकप्रिय झाला होता. आजही प्रेक्षक या गाण्याची आठवण काढतात. आजारी असतानाही त्यांनी कामाप्रती असलेली निष्ठा दाखवली.
शेखर कपूर यांनी श्रीदेवींच्या चार्ली चॅप्लिनच्या अभिनयाचाही उल्लेख केला. या भूमिकेसाठी त्यांनी रात्रीभर चार्ली चॅप्लिनचे चित्रपट पाहिले. त्यानंतर त्यांनी अप्रतिम अभिनय साकारला. म्हणजे समोर कोणतीच व्यक्ती नसताना असल्याचा भास दाखवत अभिनय करायचा.
शेखर कपूर यांनी श्रीदेवींच्या अभिनयातील विविध पैलूंचे कौतुक केले. त्यांच्या प्रतिभेची तुलना करणे कठीण असल्याचे त्यांनी सांगितले. “क्या एक्ट्रेस है अब कहां ऐसी एक एक्ट्रेस मिलेगी?” असे ते म्हणाले.
श्रीदेवींनी आपल्या कारकिर्दीत जवळपास 74 चित्रपट केले. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांनी लोकप्रियतेचे शिखर गाठले. त्यांचा अभिनय आणि नृत्य आजही चाहत्यांच्या स्मरणात आहे.