साउथ अभिनेत्री श्रीदेवीचं दशकापूर्वीचं मराठी गाणं; पंजाबी गायिकेने बनवलं अजरामर; आजही ऐकतात लोक
लग्नसराई सुरू झाली की हळदी, मेहंदी आणि संगीत समारंभासाठी खास गाण्यांची निवड केली जाते. अशा वेळी गेल्या 14 वर्षांपासून एक मराठी गाणं आजही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे. अभिनेत्री श्रीदेवीवर चित्रित झालेलं हे गाणं लग्नसोहळ्याची रंगत वाढवतं.

'नवराई माझी लाडाची' हे गाणं 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'इंग्लिश-विंग्लिश' या चित्रपटातील आहे. या गाण्यावर हळदी आणि मेहंदीच्या कार्यक्रमात अनेक तरुणी उत्साहाने नृत्य करतात.
गाण्याच्या सुरुवातीचे बोल मराठी भाषेत आहेत. यात आई आपल्या लाडक्या मुलीचं कौतुक करत तिच्या आवडीनिवडी आणि लाडाकोडात झालेल्या संगोपनाची भावना व्यक्त करते.
या गाण्याचे शब्द स्वानंद किरकिरे यांनी लिहिले आहेत. अमित त्रिवेदी यांनी संगीत दिलं असून सुनिधी चौहान, स्वानंद किरकिरे आणि नताली डि लुसियो यांनी आवाज दिला आहे.
सोनी म्युझिक इंडियाने 2012 मध्ये हे गाणं YouTube वर प्रदर्शित केलं होतं. आजवर या गाण्याला 13 कोटी 45 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
'इंग्लिश-विंग्लिश' चित्रपटात श्रीदेवी यांनी एका मध्यमवर्गीय महिलेची भूमिका साकारली होती. इंग्रजी येत नसल्यामुळे कुटुंबाकडून होणारी चेष्टा थांबवण्यासाठी ती इंग्रजी शिकण्याचा निर्णय घेते. या चित्रपटात आदिल हुसैन, प्रिया आनंद आणि नविका कोटिया यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या.