
Personal Finance Tips: स्वप्न पूर्ण करण्यासाठी गृहकर्ज, वाहन कर्ज अथवा वैयक्ति कर्ज घेणे हे सर्वसामान्य आहे. पण या कर्जाची लवकर परतफेड केली नाही की आपण मग EMI च्या फेऱ्यात रुततो. हप्ता फेडण्यात आपली मोठी रक्कम खर्च होते. त्यातून बाहेर कसं पडणार? असा सवाल सतावतो.

सर्वात अगोदर तुमच्यावरील सर्व खर्च, ईएमआय, क्रेडिट कार्डचा हप्ता याचा हिशेब मांडा. सर्वाधिक व्याज कशावर द्यावे लागत आहे. ते समोर ठेवा. तर कुणाचे किती रक्कम परत करायची आहे, याचा एक ताळेबंद तयार करा. सर्वाधिक व्याजदर असणाऱ्या हप्त्यावर अधिक लक्ष द्या.

जर क्रेडिट कार्ड, अथवा वैयक्तिक कर्जावरील व्याज अधिक असेल तर ते जिथे कमी व्याजदर असेल अशा बँकेत हस्तांतरीत करण्याचा प्रयत्न करा. यामुळे तुमचा ईएमआय कमी होईल आणि तुम्हाला थोडी सवलत भेटेल. तर कर्जही लवकर फेडल्या जाईल.

जिथे शक्य आहे तिथे छोटे-छोटे पेमेंट करा. त्यामुळे कर्जाचा हप्ता कमी होईल. वर्षातून एकदा तरी एक अतिरिक्त हप्ता जमा करा. त्यामुळे तुमचा मोठा फायदा होईल. कर्जाचा हप्ता आणि त्यावरील व्याज पुढील दहा वर्षात एकदम कमी होईल.

अतिरिक्त कमाईचे साधन शोधा. फ्रीलांसिंग अथवा पुस्तक विक्री सारखी कामं करून अतिरिक्त कमाई करु शकता. अथवा इतर तुमच्या कौशल्यानुसार काही पार्ट टाईम, फावल्या वेळेत काही कमाई होत असेल तर त्यावर भर द्या. म्हणजे तुमच्या कर्जाच्या हप्त्याची व्यवस्था होईल.

जर तुमचा मासिक खर्च अचानक वाढला असेल तर अनेक बँका या EMI री स्ट्रक्चरिंग हा पर्याय देतात. यामध्ये हप्ता कमी होतो आणि कालावधी वाढतो. व्याज अधिक द्यावे लागते. पण जर हात दगडाखाली असेल तर सुटकेचा मार्ग शोधणे ही खरी चतुराई मानण्यात येते.

काटकसर, वायफळ खर्चावर कात्री फिरवा. जिथे गरज नाही तिथे खर्च टाळा. आवर्ती ठेव योजनेत पैसे साठवा. त्यावर आलेल्या व्याजात अजून एक रक्कम मिळवा आणि पाच वर्षांपर्यंत ही रक्कम वाढवत न्या. म्हणजे एक मोठी रक्कम जमा होईल. त्यातून कर्जाचे दोन ते तीन हप्ते सहज तुम्ही फेड करू शकता. खर्चाचा आणि कमाईचा ताळेबंद मांडा. म्हणजे तुम्ही ईएमआयच्या जंजाळातून बाहेर पडाल.