Abhijeet Dipke: आता कानाखाली खावी लागेल; अभिजीत दीपकेला प्रचंड भीती, मनातली गुपित गोष्ट सांगितली

Abhijeet Dipke: अभिजीत दीपके नुकताच छत्रपती संभाजीनगर येथील निवासस्थानी पोहोचला आहे. त्यावेळी त्याने जे वक्तव्य केले आहे त्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

| Updated on: Jul 29, 2026 | 5:14 PM
1 / 5
कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना अभिजीतने मोठं गुपित सांगितलं आहे.

कॉकरोच जनता पार्टीचा संस्थापक अभिजीत दीपके केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रात आला आहे. छत्रपती संभाजीनगर येथे त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. दरम्यान, माध्यमांशी बोलताना अभिजीतने मोठं गुपित सांगितलं आहे.

2 / 5

घरी आल्यावर नेहमीच काही तरी खास असतं. सगळेजण आनंदी आहेत. आमचा मुलगा आता बराच वेळ घरी थांबेल असे पालक सांगत आहेत असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अभिजीतने, थांबायची इच्छा आहे. पण जास्त वेळ थांबता येणार नाही असे उत्तर दिले.

3 / 5

त्यानंतर एका पत्रकराने अभिजीत आमचा गुरु झाला आहे असे आई-वडिलांनी सकाळी म्हटले. या क्षण किती महत्त्वाचा आहे हा आंदोलनानंतरचा असा प्रश्न विचारला. त्यावर उत्तर देताना हसत अभिजीत म्हणाला की, हा क्षण काही महत्त्वाचा नाही. घरात गेल्यावर मला चापटा पडतील. आई-वडिलांना थोडं फार घाबरावं लागणार.

4 / 5

अभिजीत दीपकेचा आंदोलन संपल्यानंतरचा पार्टी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्याविषयी बोलताना अभिजीत म्हणाला की, 36 दिवस संघर्ष केल्यानंतर एक दिवस आनंद साजरा केला तर वाईट काय आहे. आम्ही भाजप सारखे रस्ते तर अडवले नाहीत. रस्त्यावर तर माज दाखवला नाही.

5 / 5

अभिजीत दीपके हा परदेशात शिक्षण घेत होता. मात्र, विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी त्याने कॉकरोच जनता पार्टी सुरु केली. त्यानंतर नीट पेपर फुटी नंतर त्याने दिल्ली येथील जंतर मंतर येथे आंदोलन केले. या आंदोलनात लाखो विद्यार्थी सहभागी झाले. आता अभिजीत दीपके हा देशाचा युवा चेहरा मानला जात आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us