Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी आणि बॉबी देओलचा मोठा निर्णय, खंडाळा येथील फार्महाऊस…

Dharmendra: बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांनी 24 नोव्हेंबर रोजी अखेरचा श्वास घेतला आहे. अनेकदा धर्मेंद्र हे खंडाळा येथील फार्महाऊसवर वेळ घालवताना दिसायाचे. आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर या फार्महाऊसबाबत त्यांची मुले सनी देओल आणि बॉबी देओल यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

Updated on: Dec 04, 2025 | 4:16 PM
1 / 5
बॉलिवूडचे ही मॅन म्हणून ओळखले जाणारे दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांना धक्का बसला आहे. येत्या काही दिवसांमध्ये धर्मेंद्र यांचा 90वा वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जाणार होता. पण त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. आता धर्मेंद्र यांची मुले बॉबी देओल आणि सनी देओल यांनी मोठा निर्णय घेतला आहे. आता हा निर्णय काय आहे चला जाणून घेऊया...

2 / 5
धर्मेंद्र यांना त्यांचा खंडाळा येथील फार्महाऊस खूप आवडत होता. त्यांनी अनेकदा या फार्महाऊसवर जाऊन वेळ घालवला आहे. त्यांनी करोना काळात याच फार्महाऊसवर भाज्या वैगरे लावल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या ९०वा वाढदिवस याच फार्महाऊसवर साजरा करण्याचा निर्णय सनी आणि बॉबीने घेतला होता. आता धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सनी आणि बॉबीने मोठा निर्णय घेतला आहे.

3 / 5
हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, 'सनी आणि बॉबी यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती आणि वारशाचा आदर करण्यासाठी फार्महाऊसवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना जाणवले की अनेक चाहत्यांना धर्मेंद्र यांना शेवटचे भेटण्याची किंवा पाहण्याची संधी मिळावी. म्हणूनच त्यांनी अशा चाहत्यांसाठी फार्महाऊसचे द्वार उघडण्याचा निर्णय घेतला आहे जे येऊन त्यांना श्रद्धांजली अर्पण करू इच्छितात आणि कुटुंबाला भेटू इच्छितात. कुटुंब देखील फार्महाऊसमध्ये चाहत्यांना भेटणार आहे.' सूत्राने पुढे सांगितले की तयारी सुरू झाली आहे.

4 / 5
सूत्राने सांगितले, 'असे नाही की त्यांनी कोणताही कार्यक्रम किंवा इतर आयोजन केले आहे, तर त्यांनी अशा लोकांसाठी दरवाजे उघडले आहेत जे येऊन त्यांच्या वडिलांना आदरांजली वाहू इच्छितात. वाहतूकच्या दृष्टीने फार्महाऊसकडे जाण्याचा रस्ता हवा तसा ठिक नाही. मात्र, हे किती लोक सहभागी होत आहेत यावर अवलंबून असेल, ज्याची अजून खात्री नाही.'

5 / 5
सनी देओल आणि बॉबी देओल यांनी बुधवारी सकाळी हरिद्वारमधील हर की पौडीवर पवित्र गंगा नदीत धर्मेंद्र यांच्या अस्थींचे विसर्जन केले. 24 नोव्हेंबरला 89 वर्षांच्या धर्मेंद्र यांचे निधन झाले. धर्मेंद्र हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. अचानक तब्बेत खालावल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. नंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.