Sunny Deol : प्रायव्हेट थिएटर, जिम, स्विमिंग पूल आणि हेलिपॅड ; सनी देओलच्या कोट्यवधींच्या घरात काय काय?

अभिनेता सनी देओल केवळ आपल्या दमदार अभिनयासाठीच नव्हे, तर कोट्यवधींच्या रिअल इस्टेटसाठीही चर्चेत आहे. मुंबईतील मलबार हिल, जुहू आणि ओशिवरा येथील आलिशान बंगले व अपार्टमेंट्स, तसेच लोणावळ्यातील 100 एकरचे विस्तीर्ण फार्महाऊस ही त्यांच्या मालमत्तेची काही प्रमुख उदाहरणं आहेत.

| Updated on: Aug 12, 2026 | 2:13 PM
1 / 7
बॉलिवूडचा ‘ढाई किलो का हाथ’ म्हणून ओळखला जाणारा अभिनेता सनी देओल सध्या आपल्या आगामी ‘बंटवारा 1947’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. 14 ऑगस्टला हा चित्रपट सिनेमागृहात दाखल होणार असून, सनी देओलसोबत प्रीती झिंटा आणि त्याचा मुलगा करण देओलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.  पण चित्रपटाच्या चर्चेसोबतच सनी देओलची कोट्यवधींची रिअल इस्टेटही कायम चाहत्यांचे लक्ष वेधून घेते. मुंबईतील पॉश भागांपासून ते लोणावळ्यातील निसर्गरम्य फार्महाऊसपर्यंत सनी देओल आणि देओल कुटुंबाकडे आलिशान प्रॉपर्टीज असल्याचे रिपोर्ट्समध्ये अनेक रिपोर्ट्समध्ये नमूद करण्यात आलं आहे.  (all photo : PTI)

2 / 7

सनी देओल मुंबईतील मलबार हिल परिसरात एका आलिशान घराचे मालक आहे. हा मुंबईतील सर्वात पॉश परिसरांपैकी एक आहे. रिपोर्टनुसार, या प्रॉपर्टीमध्ये अनेक मोठ्या सुविधा आहेत.

3 / 7

यामध्ये प्रायव्हेट सिनेमा थिएटर, आधुनिक जिम, स्विमिंग पूल आणि हेलिपॅड यांचा समावेश आहे. असे म्हटले जाते की, हे घर इतके मोठे आहे की येथे सुमारे 50 पाहुणे आरामात राहू शकतात.

4 / 7

देओल कुटुंबाचं मुंबबईतील जुहू परिसरातही घर आहे. हे घर ‘धर्मेंद्र हाऊस’ म्हणून ओळखलं जातं. अनेक दशकांपासून हे घर देओल कुटुंबाचे निवासस्थान आहे. या घराची किंमत अंदाजे 60 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.

5 / 7

एवढंच नव्हे तर, देओल कुटुंबाचं लोणावळ्यात सुमारे 100 एकरांवर पसरलेलं मोठे फार्महाऊस देखील आहे. मुंबईपासून दूर असलेल्या या प्रॉपर्टीवर सनी देओल आपल्या कुटुंबासोबत अनेकदा जातो. कोरोनाच्या काळातही कुटुंब काही काळ या फार्महाऊसमध्ये राहिलं होतं. त्यावेळी अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओही शेअर केले होते.

6 / 7

रिपोर्टनुसार, सनी देओलचं मुंबईतील ओशिवरा परिसरात एक अपार्टमेंट देखील आहे. ही प्रॉपर्टी त्याने अंदाजे 2 कोटी रुपयांना खरेदी केली होती.

7 / 7

ओशिवरा परिसरात फिल्म स्टुडिओ, प्रॉडक्शन हाऊसेस आणि टेलिव्हिजन हब असल्यामुळे मनोरंजन क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा परिसर राहण्यासाठी उत्तम मानला जातो.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us