
प्रसिद्ध अभिनेत्री सुरभी चंदाना सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते. नवनवीन फोटोशूट करत ती चाहत्यांशी कनेक्ट होते.

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’, ‘कुबूल हैं’, ‘आहट’, ‘इश्कबाज’, ‘दिल बोले ओबोरॉय’, ‘संजीवनी’ या मालिकांमध्ये सुरभीनं आपल्या अभिनयाचा जलवा दाखवला आहे.

या मालिका गाजवल्यानंतर आता सुरभी ‘नागिन 5’मध्ये झळकणार आहे.

नुकतंच तिनं एक नवं फोटोशूट करत हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

हे फोटो चाहत्यांच्या चांगलेच पसंतीस उतरले आहेत. या फोटोंमध्ये ती कमालीची सुंदर दिसतेय.

तिचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रेंड होत आहेत.