
बिग बॉस मराठी सिझन पाचमध्ये टिक-टॉक स्टार सूरज चव्हाण सहभागी झाला आणि साधेपणामुळे महाराष्ट्रातील प्रेक्षकांची मने जिंकू लागला. बिग बॉसच्या घरात सूरजने रिल्सस्टार अंकिता वालावलकरला बहिण मानले होते. आता अंकिताने सूरजच्या खासगी आयुष्यावर प्रतिक्रिया दिली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सूरज चव्हाणच्या लग्नाची जोरदार चर्चा रंगली होती. त्याने सोशल मीडियावर प्रीवेडिंग फोटोशूटचे फोटो शेअर केले होते. पण खरच सूरजच लग्न होणार आहे का? असा प्रश्न सर्वांना पडला.

सूरजने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर एका मुलीसोबत साऊथ इंडियन पोशाखात फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत त्याने केवळ हार्ट इमोजीचा वापर केला होता. त्यामुळे सूरजच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आले होते.

अंकिता वालावलकरने सोशल मीडियावर सूरजच्या होणाऱ्या बायकोसोबतचा फोटो शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने, 'सूरजला खूप खूप शुभेच्छा! लग्नाला येणं शक्य होईल असं वाटत नसल्यामुळे ही भेट' असे म्हटले आहे.

आता चाहत्यांमध्ये सूरजच्या लग्नाची उत्सुकता वाढली आहे. तो कोणत्या मुलीशी लग्न करत आहे? कधी लग्न करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.