सूरज चव्हाण निघाला येडा बनून पेढा खाणारा! खरा चेहरा समोर, नेमकं काय घडलं?

बिग बॉस मराठी सिझन पाचचा विजेता सूरज चव्हाणने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. त्याने त्याच्या साधेपणावर वक्तव्य केले आहे. सूरज नेमकं काय म्हणाला जाणून घ्या...

| Updated on: Mar 25, 2026 | 1:29 PM
1 / 7
बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. टिकटॉकवरून रीलस्टार बनलेल्या सूरजने सोशल मीडियावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यावर महाराष्ट्राला त्याची एक पूर्णपणे नवीन बाजू दिसली.

बिग बॉस मराठी सीझन ५ चा विजेता सूरज चव्हाण हा कायमच चर्चेत असतो. टिकटॉकवरून रीलस्टार बनलेल्या सूरजने सोशल मीडियावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. पण बिग बॉसच्या घरात प्रवेश केल्यावर महाराष्ट्राला त्याची एक पूर्णपणे नवीन बाजू दिसली.

2 / 7

सुरुवातीला सगळ्यांनी एकच मत दिले “सूरज खूप साधा-भोळा आहे.” त्याच्या देखाव्यावरून, रील्सवरून त्याची अनेकदा थट्टा उडवली गेली. “भोळा” म्हणून त्याची फसवणूकही झाली आणि त्याला कमी लेखले गेले. पण खरंच तो भोळा आहे की नाही, याचे उत्तर सूरजने स्वतःच दिले आहे.

3 / 7

नुकत्याच एका मुलाखतीत सूरज चव्हाण म्हणाला, “येडे चाळे केले म्हणून इथपर्यंत पोहोचलो. येडे चाळे न करता फेमस होत नाही, लोक तुम्हाला बघतही नाहीत. सगळे येडा म्हणतात, पण हा येडा शहाण्यालाही मागे टाकून पुढे जातो आणि पेढा खातो तोही देवाचा... मोदक!”

4 / 7

भोळा असण्याबाबत विचारले असता सूरजने स्पष्ट सांगितले, “मी नाटक करत नाही. मी खरोखर भोळा आणि साधा-सिंपल आहे. मी जमिनीवर राहतो म्हणून आज स्टार झालो आणि लोकांच्या काळजात बसलो. खोटं कशाला बोलू? मला वाचायला-लिहायला फारसे येत नाही, गोष्टी लक्षात राहत नाहीत. पण भोळा म्हणजे शिवशंभूचा लेक! बुद्धी कमी, पण ज्ञान खूप आहे.”

5 / 7

बिग बॉस जिंकल्यानंतर सूरजने केदार शिंदे यांच्या ‘झापुक झुपूक’ चित्रपटात काम केले. हा सिनेमा थिएटरमध्ये फारसा चालला नाही, तरीही सूरजला मोठ्या पडद्यावर पाऊल टाकण्याची संधी मिळाली.

6 / 7

सूरजच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचे झाले तर डिसेंबर २०२५ मध्ये सूरज चव्हाणने लग्न केले. लग्नापूर्वी त्याने स्वतःचे नवे घर बांधले. त्याने आपल्या मामाची मुलगी संजना गोफणेशी विवाह केला. लग्नानंतर दोघांचे गोड रील्स आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.

7 / 7

साधा दिसणारा, भोळा वाटणारा सूरज चव्हाण खरं तर आपल्या ‘येड्या’ चाळ्यांनीच यश मिळवणारा एक हुशार खेळाडू आहे, हे त्याने स्वतःच सिद्ध केले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us