माझं लग्न होऊ द्या! सूरज चव्हाण भर मांडवात चिडला, आजारी पडला! नेमकं काय घडलं होतं?

Suraj Chavan Wedding Drama: बिग बॉस मराठी सिझन 5चा विजेता सूरज चव्हाण सध्या त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. त्याने मामाची मुलगी संजनाशी लग्न केले. सध्या सूरजच्या लग्नातील फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एका व्हिडीओमध्ये सूरज चिडल्याचे दिसत आहे. आता नेमकं काय झालं होतं? चला जाणून घेऊया...

Updated on: Dec 02, 2025 | 5:13 PM
1 / 5
‘बिग बॉस मराठी सीझन ५’चा विजेता सूरज चव्हाण उर्फ ‘गुलीगत किंग’ नुकताच विवाहबद्ध झाला. पुण्याजवळील सासवड येथे अतिशय दिमाखात त्याचा लग्नसोहळा पार पडला. लग्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून संपूर्ण महाराष्ट्र उत्सुक होता आणि लाखो चाहत्यांनी लग्नमंडप गजबजून टाकला. सूरजची मानलेली बहिण जान्हवी किल्लेकर या लग्नाला गेली होती. दरम्यान, गर्दी बघून सूरज संतापला होता. नेमकं काय झालं होतं? जाणून घ्या...

2 / 5
सूरजच्या लग्नाला मराठी-हिंदी सेलिब्रिटींसह राजकीय नेतेही येणार होते, पण काही कारणास्तव त्यांना येणे शक्य झाले नाही. मात्र चाहत्यांनी सूरजचे लग्न खऱ्या अर्थाने गाजवले. एवढी प्रचंड गर्दी जमली की आयोजकांना तब्बल 50 बॉडीगार्ड्स तैनात करावे लागले. मंडपात VIP झोन, प्रवेशद्वार, सर्वत्र बॉडीगार्ड्सचे जाळे पसरले होते. तरीही चाहत्यांची उत्साहाची लाट रोखणे कठीण झाले.

3 / 5
सूरजला दम्याचा जुना त्रास आहे. ‘बिग बॉस’च्या घरातही तो याबद्दल उघडपणे बोलला होता. लग्नात अचानक एवढी गर्दी उसळली की सूरजचा श्वास घेणे कठीण झाले आहे. काही वेळ तो मंडप सोडून हॉलमधील एका खोलीत आराम करण्यासाठी गेला. तिथून त्याने माईक घेऊन चाहत्यांना हात जोडून विनंती केली.

4 / 5
“हॅलो… तुमचा लाडका टॉपचा किंग सूरज चव्हाण बोलतोय. तुम्ही सगळे इतक्या दूरून माझ्या लग्नासाठी आलात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. पण मला तुमचं सहकार्य हवंय. तुम्हा सगळ्यांना माहितीच आहे ना, मला दम्याचा त्रास आहे. मी नक्कीच सगळ्यांसोबत फोटो काढेन… पण आधी माझं लग्न तरी होऊ द्या!” असे सूरज चव्हाण म्हणाला.

5 / 5
चाहत्यांनी टाळ्यांचा कडकडाट करत त्याला साथ दिली आणि मगच सूरज परत मंडपात आला. पण या साऱ्या गोंधळात तब्बल दोन तास उशीर झाला. सूरजची बहिण जान्हवी किल्लेकर हिचाही संयम सुटला होता. ‘किलर गर्ल’ने भर मंडपात आलेल्या अतिउत्साही चाहत्यांना चांगलेच सुनावले. शेवटी प्रेम, उत्साह आणि थोडासा गोंधळ यांनी भरलेला सूरज-जान्हवीचा लग्नसोहळा अखेर यशस्वीपणे पार पडला. आता ‘गुलीगत किंग’ची नवी इनिंग सुरू झाली.