
ग्रहांचे राजा सूर्य सध्या मकर राशीत विराजमान आहेत. सूर्य ग्रह मकर राशीतून बाहेर पडून आता कुंभ राशीत प्रवेश करणार आहेत. कुंभ राशीत सूर्याच्या प्रवेशामुळे अनेक राशींच्या जीवनावर त्याचा प्रभाव पडेल. सूर्य ग्रह 13 फेब्रुवारी 2026, शुक्रवार रोजी सकाळी 4 वाजून 14 मिनिटांनी कुंभ राशीत प्रवेश करतील. सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे 3 राशींना लाभ मिळेल. या राशींच्या जीवनात चांगल्या दिवसांची सुरुवात होईल. चला जाणून घेऊया की, सूर्याच्या गोचरामुळे कोणत्या राशींचे भाग्य बदलेल...

सूर्य ग्रहाचा कुंभ राशीत गोचर होणे अत्यंत लाभदायक ठरते. कुंभ राशीत हा गोचर धनु राशीच्या लोकांसाठी चांगला ठरेल. याच्या प्रभावाने धनु राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात प्रगती मिळेल. आरोग्यावर चांगला परिणाम होईल. व्यवसायिकांना एखादी मोठी डील होण्याने भरघोस फायदा होऊ शकतो.

कुंभ राशीत सूर्याचा प्रवेश होणे कुंभ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. सूर्याचा गोचर शनिची राशी असलेल्या कुंभमध्ये चांगला सिद्ध होईल. तुम्हाला एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमच्या सुख-समृद्धीत वाढ होईल. व्यवसायिकांना फायदा मिळेल आणि चांगल्या दिवसांची सुरुवात होईल.

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत फायदेशीर राहणार आहे. तुमच्या उत्पन्नात वाढ होण्याची शक्यता आहे. नोकरीत बढती मिळाल्याने पगार वाढू शकतो. व्यवसाय करणाऱ्यांना विशेष फायदा मिळेल. आरोग्य आणि धनाच्या बाबतीत तुमच्यासाठी काळ चांगला राहील. तुम्ही पूर्ण श्रद्धा आणि भक्तीने सूर्यदेवाची पूजा करा.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)