Suryakumar Yadav: सूर्याने मध्यरात्री अचानक पोस्ट केली, थेट जय शाह, राहुल द्रविड, गौतम गंभीर यांचा उल्लेख करत…
Suryakumar Yadav Post: सूर्यकुमार यादवने एक पोस्ट शेअर केली. मध्यरात्री सूर्याने अचानक पोस्ट शेअर केली ज्यात त्याने चौघांच्या नावांचा उल्लेख केला.

सूर्यकुमार यादव सध्या देशांतर्गत सामने खेळत आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये तो मुंबईची कमान सांभाळत आहे. तो भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी अथक प्रयत्न करत आहे. आता याच सूर्यांने मध्यरात्री एक पोस्ट शेअर केली.
सूर्याने या पोस्टमध्ये आर्वजून राहुल द्रविड, रोहित शर्मा, गौतम गंभीर आणि जय शाह यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. सूर्याने ही पोस्ट करण्याचे कारण म्हणजे त्याला मिळालेला पुरस्कार. मिळालेल्या पुरस्काराचे क्रेडिट त्यानं चौघांना दिले.
सूर्या म्हणाला की, " हा पुरस्कार माझा एकट्याचा नाही, ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला, जे माझ्या बाजूने नेहमीच उभे राहिले. त्यांचा हा पुरस्कार आहे. जय शाह सर बीसीसीआयचे सचिव असताना त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला संधी दिली. ज्यामुळे माझा नवीन प्रवास सुरु झाला." असं सूर्याने या पोस्टमध्ये लिहिले आहे.
"रोहित भाई, राहुल द्रविड सर जेव्हा मला सर्वाधिक गरज होती तेव्हा माझ्यावर विश्वास दाखवून मला कर्णधारपदाची जबाबदारी दिल्यामुळे तुमचे मी मनापासून आभार मानतो. नेतृत्त्व करण्याचा, शिकण्याचा आणि स्वत:ला घडवणाचा आत्मविश्वास तुम्ही मला दिलात. हाच विश्वास मी आयुष्यभर जपेन" असं सूर्या म्हणाला.
गौतम गंभीर प्रशिक्षक म्हणून या संपूर्ण प्रवासात प्रत्येक टप्यावर माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहिले, मला पाठिंबा दिला, माझ्यावर विश्वास दाखवला याबद्दल धन्यवाद."