AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Yogesh Kadam : योगेश कदम यांचं चांगलं पाऊल, पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना स्वत: भेटायला गेले आणि विचारलं…

Yogesh Kadam in Nagpur: पोलीस भरतीत नशीब आजमावणाऱ्या तरुणांशी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी संवाद साधला. त्यांनी यावेळी त्यांच्या अडचणी तर जाणून घेतल्याच पण त्यांना मोठे आश्वासनही दिले.

Yogesh Kadam : योगेश कदम यांचं चांगलं पाऊल, पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना स्वत: भेटायला गेले आणि विचारलं...
योगेश कदम पोलीस भरतीसाठी आलेल्या मुलांना स्वत: भेटले आणि विचारलं..
| Updated on: Nov 20, 2026 | 10:00 AM
Share

गजानन उमाटे, प्रतिनिधी, टीव्ही 9 मराठी : गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नागपुरात पोलीस भरती करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. त्यांनी यावेळी ग्रामीण भागातून आलेलेया तरुणांच्या अडीअडचणी समजून घेतल्या. यावेळी त्यांनी पोलीस मैदानांविषयी सरकारने घेतलेल्या निर्णयाची माहिती दिली. यामुळे तरूणांमध्ये उत्साह संचारला आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता मैदानं सरावासाठी वापरता येतील. दुष्काळी भागातील मुलांना पोलीस भरतीत दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचेही कदम म्हणाले.

सर्व मैदानं वापरता येतील

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी नागपुरात पोलीस भरती करणाऱ्या तरुणांशी संवाद साधला. योगेश कदम यांनी रेशीमबाग मैदान येथे पोलीस भरती करणाऱ्या तरुणांकडून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सर्व मैदानं पोलीस भरतीच्या मुलांना मोफत देण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. पोलीस भरतीला ९० टक्के मुलं ग्रामीण मुलं आहेत. दुष्काळी भागातील मुलांना पोलीस भरतीत दिलासा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय, अशी माहिती त्यांनी दिली.

मिशन खाकी उपक्रम

रेशीमबाग मैदानानवर कदम यांनी पोलीस भरतीसाठी आलेल्या उमेदवारांशी संवाद साधला. साठेआड हजार पदांसाठी सुमारे 18 लाख मुलांनी परीक्षा दिली होती. या पोलीस भरतीत 90 टक्के उमेदवार हे ग्रामीण भागातील असतात. दुष्काळी भागातील तरुणांना पोलीस भरतीत दिलासा देण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मोठे वक्तव्य त्यांनी केले. तर मिशन खाकी हा उपक्रम सुरू करण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. यावेळी सर्व मैदानं पोलीस भरतीच्या मुलांना मोफत उपलब्ध करून देण्याचा महत्त्वाचा निर्णय त्यांनी जाहीर केला.

कर्जाच्या सक्तीने वसुलीवर स्पष्ट भूमिका

अकोला येथे शेतकऱ्यांकडून सक्तीने कर्ज वसुली होत असल्याबाबत योगेश कदम यांनी भूमिका स्पष्ट केली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. राज्यात कुठेही सक्तीने वसूली केल्यास संबंधितांविरोधात कठोर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. एसआयआर मुद्यावर भाष्य करताना, देशाबाहेरील व्यक्तींची नावे वगळली जाणार आहेत, त्यात गैर काय? असे योगेश कदम म्हणाले.

Follow Us
राहुल गांधींचा दावा! केंद्रातील मंत्री आमच्या संपर्कात, 8 महिन्यात...
राहुल गांधींचा मोठा दावा! केंद्रातील मंत्री विरोधकांच्या संपर्कात, 8 महिन्यांत मोठ्या घडामोडी?
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल...
छोटा शकीलचा मेहुणा सलीम फ्रुटवालाचा खळबळजनक व्हिडीओ व्हायरल, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या...
दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता
Drought Affected Students : दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय, आता वार्षिक...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद, थेट न्यायालयात..
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद कायम, थेट न्यायालयात याचिका दाखल
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात...
शरद पवार, वळसे पाटील आणि भुजबळ येणार एकाच मंचावर? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी...
PUC : केद्र सरकारचा मोठा निर्णय; वाहनाच्या PUC प्रमाणपत्राच्या वैधतेसाठी नवे नियम जारी...
तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना...
PM Modi : तुम्ही कर्मचाऱ्यांचा पगार वाढवला का? पंतप्रधान मोदींचा उद्योगपतींना थेट सवाल
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र...
सोनिया गांधींच्या पुस्तकावर बंदी घाला! बड्या नेत्याची CM देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो...
दादरच्या नामकरणावरून संभ्रम दूर! रेल्वे स्थानकाला नाही, मेट्रो स्टेशनला मिळणार चैत्यभूमी नाव
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या
मुंबई बँक निवडणुकीसाठी शिंदेसेनेची मोठी तयारी; स्वबळावर लढणार? आजच्या बैठकीत ठरणार रणनीती!