
रेने आणि अली या सुष्मिताच्या दोन्ही मुली आता मोठ्या झाल्या आहेत. रेने आता 26 वर्षांची झालीय. या दरम्यान रेनेचे काही फोटो सुष्मिताने शेअर केले. त्यात रेने खूप सुंदर दिसतेय. बिनधास्त आणि ग्लॅमरस दिसतेय. रेने पेशाने अभिनेत्री आहे. रेने सोशल मीडियावर खूप Active आहे.

रेनेने या फोटोजमध्ये ब्लॅक बलून ड्रेस परिधान केला आगे. थाई हाई स्लिट आहे. न्यूड मेकअप केला आहे. केस मोकळे सोडले आहेत. एका फोटोमध्ये रेनेने बॉडी फिटेड ड्रेस परिधान केलाय.

हे दोन्ही फोटोज पाहून फॅन्सच्या मनात खळबळ उडाली आहे. त्यांनी नोटिस केलय की रेने हुबेहूब स्मिता पाटील सारखी दिसते.

इतकच नाही, स्मिता पाटील यांचे काही जुने फोटो काढून फॅन्सनी रेनेला तिच्यासोबत कम्पेयर केलय. एका फॅनने लिहिलय की, रेनेला पाहून एका सेकंदासाठी वाटलं की, ती दुसरी स्मिता पाटीलच आहे.

एका चाहत्याने लिहिलय की, ही इतकी मोठी कधी झाली, समजलच नाही. पण ही स्मिता पाटील यांच्यासारखीच दिसते. कमालीची सुंदर दिसते.