AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गोळीबार लाइव्ह दाखवला? रोहित शेट्टी प्रकरणात धक्कादायक खुलासा, बॉलिवूड हादरले

चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या घरी रात्री उशिरा झालेल्या गोळीबारानंतर मुंबई पोलिसांनी आरोपींना अटक केली आणि त्यांची चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

गोळीबार लाइव्ह दाखवला? रोहित शेट्टी प्रकरणात धक्कादायक खुलासा, बॉलिवूड हादरले
Image Credit source: Social media
| Updated on: Feb 01, 2026 | 7:23 PM
Share

Rohit Shetty : बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या मुंबईतील जुहू परिसरातील निवासस्थानी रात्री उशिरा झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर तपासात एक अत्यंत धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणातील आरोपींना अटक करून चौकशी केली असता, गोळीबाराची संपूर्ण घटना आरोपीने व्हिडिओ कॉलद्वारे कोणाला तरी लाईव्ह दाखवली असल्याचा संशय पोलिसांना आहे.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्राथमिक तपासात असे संकेत मिळाले आहेत की, गोळीबाराच्या वेळी आरोपी व्हिडिओ कॉलवर सक्रिय होता. त्यामुळे आता पोलीस या दिशेने सखोल तपास करत असून, गोळीबाराची घटना नेमकी कोणाला दाखवण्यात आली, याचा शोध घेतला जात आहे. हा कॉल देशातच झाला की परदेशातून तसेच यामागे कुठली गुन्हेगारी टोळी किंवा मास्टरमाइंड आहे का याचाही तपास सुरू आहे.

रोहित शेट्टीचे घर मुंबईतील जुहू या उच्चभ्रू आणि सुरक्षेच्या दृष्टीने संवेदनशील परिसरात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गोळीबारात दोन गोळ्या झाडण्यात आल्या. यापैकी एक गोळी पहिल्या मजल्यावरील काचेवर तर दुसरी गोळी तिसऱ्या मजल्यावरील काचेवर लागली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली.

घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन डेटा आणि तांत्रिक पुरावे तपासण्यात येत आहेत. आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या मोबाईल फोनची फॉरेन्सिक तपासणीही सुरू करण्यात आली असून व्हिडिओ कॉल, सोशल मीडिया किंवा मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे संपर्क साधण्यात आला होता का याचा शोध घेतला जात आहे.

या घटनेनंतर रोहित शेट्टीच्या घराबाहेर पोलिस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. जुहू परिसरात अतिरिक्त पोलीस पथके तैनात करण्यात आली असून मुंबई गुन्हे शाखेचे विशेष पथक या संपूर्ण प्रकरणाचा तपास करत आहे. तसेच, दिग्दर्शकाच्या सुरक्षेचाही नव्याने आढावा घेण्यात येत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, गोळीबारासारख्या गंभीर घटनेत व्हिडिओ कॉलद्वारे लाईव्ह प्रक्षेपण केल्याचा संशय खरा ठरल्यास हे प्रकरण केवळ धमकीपुरते मर्यादित नसून पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे पोलीस तपास अधिक तीव्र करण्यात आला असून या प्रकरणातील सर्व दुवे उलगडण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Follow Us
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट..
वाल्मिक कराड गॅंगच्या सुग्रीव कराडची उमरी टोल नाक्यावर गुंडगिरी? थेट...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत...
पाकिस्तानला धूळ चारत भारताचा दणदणीत विजय; आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक!
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित..
विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य, तरीही आंदोलन कशासाठी? सरकारचा रोहित पवारांना थेट सवाल!
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची भेट
प्रदीप पूर्णेकर प्रकरणानंतर सुषमा अंधारेंनी घेतली कुटुंबीयांची सांत्वनपर भेट; म्हणाल्या...
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
मोठी जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड फवारा; हजारो लिटर पाणी वाया!
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक...
प्रदीप पुर्णेकर प्रकरणी ठाकरेंच्या जिल्हा महिला संघटनेचा धक्कादायक दावा; जात प्रमाणपत्राचा मुद्दा चर्चेत
तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; राणेंचा दिपकेंवर निशाणा
Nitesh Rane : तुकडे-तुकडे गँगचे सदस्य CJPच्या मंचावर; नितेश राणेंचा अभिजीत दिपकेंवर थेट निशाणा
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच...
जळगाव ग्रामसभेत अजब प्रकार; धूर फवारणीसंदर्भात प्रश्न विचारताच... माजी सरपंचांचा लजिरवाणा कारभार
अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी....
Asian Games 2026 : अभिषेक-तिलकचा धुमाकूळ; भारताच्या 211 धावा; पाकिस्तानसमोर गोल्डसाठी 212 रनांचं टार्गेट
छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला...
Chhatrapati sambhajinagar : ऑक्टोबरच्या सुरुवातीलाच उन्हाचा तडाखा; छत्रपती संभाजीनगरमध्ये 37°C; 5 वर्षांचा विक्रम मोडला