
केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्याविरोधात आज नागपूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारलं होतं.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर जाऊन आंदोलन करण्याचा निर्धार स्वाभिमानीच्यावतीने करण्यात आला होता.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले.

महात्मा गांधींच्या मार्गानं आंदोलन करत असताना दडपशाही करण्यात येत असल्याचा आरोप रविकांत तुपकर यांनी केला.

मोर्चाला सुरुवात होताच पोलिसांनी रविकांत तुपकर यांच्यासह स्वाभिमानीच्या 20 ते 30 कार्यकर्त्यांना अडवून ताब्यात घेतलं.

संविधान चौकात दिवाळी साजरी करुन स्वाभिमानीचे कार्यकर्ते नितीन गडकरींच्या घराच्या दिशेने निघाले होते.