
कार्यक्रमासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज नागपुरात दाखल झाले आहेत. नागपुरात दाखल झाल्यावर मोदींनी रेशिम बागेतील संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. त्यानंतर मोदी यांनी दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं.

या उद्घाटन सोहळ्याला स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमालासाठी जुन्या आखाड्याचे महामंडलेश्वर स्वामी अवधेशानंद गिरी महाराजही उपस्थित होते. तसेच स्वामी गोविंद देव गिरी महाराजही उपस्थित होते.

स्वामी गोविंद गिरी महाराज यांनी संघाचे माजी सरसंघचालक माधव गोळवलकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून त्यांना अभिवादन केलं.

माधव नेत्रालयाचा विस्तार केला जात आहे. या रुग्णालयात 250 बेड, 14 ओपीडी, 14 अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर असणार आहे. या नेत्र चिकित्सालयात आधुनिक आरोग्य सुविधा मिळणार आहेत.

पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या दौऱ्यानिमित्ताने नागपुरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप, नागपूर पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. मोदींच्या ताफ्यात 20 वाहने असणार आहे. यात व्हिआयपी वाहने आणि रेडिओ कंट्रोल्ड इम्प्रोव्हाईज्ड एक्सप्लोसिव्ह डिव्हाइस जॅमर युक्त वाहने असणार आहेत.