
यूजर्सच म्हणणं आहे की, स्वरा जेव्हापासून आई बनलीय तिने स्वत:ची काळजी घेणं सोडून दिलय. तिचं वजन खूप वाढलय. स्वरा भास्कर बोलली की, मला बाळ आहे. माझी अशी काही इच्छा नाही की, मला मूल नाही असं वाटावं.

मी एक आई असताना ही आयडीयाच मला पसंत नाही. असं का की तुम्हाला प्रत्येकवेळी 25 वर्षांच वाटायचय. मला तसं सुंदर, स्लिम-ट्रिम आणि ग्लॅमरस हिरॉइन वाटायचच नाहीय. हे होऊ शकत नाही, मी आता पंचविशीची राहिलेली नाही.

स्वराने आपली नाराजी व्यक्त करताना सांगितलं की, माझं वय आता 35 पेक्षा जास्त आहे. मला बाळ आहे. मला ग्लॅमरस दिसण्याची आवश्यकता नाही.

स्वरा भास्करने 2023 साली एका सुंदर मुलीला राबियाला जन्म दिला. तेव्हापासून अभिनेत्री चित्रपटांपासून लांब आहे.

स्वरा भास्करची सध्या पती फहाद अहमदसोबत पती-पत्नी आणि पंगा शो मध्ये खूप धमाल सुरु आहे. या जोडप्यातील छोटे-मोठा वाद आता प्रेक्षकांना खूप भावतायत. तेच काही जण स्वराच्या लूकवरुन प्रश्न उपस्थित करतायत.