Syed Mushtaq Ali Trophy : 3 SIX, 5 फोर..विराटच्या तुफानी बॅटिंगने मिळवून दिला विजय
Syed Mushtaq Ali Trophy : सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टुर्नामेंट सुरु आहे. टी20 ची देशांतर्गत ही महत्वाची स्पर्धा आहे. राज्य स्तरावरील युवा टॅलेंट या स्पर्धेत पहायला मिळतं.

सैयद मुश्ताक अली ट्रॉफी टुर्नामेंटमध्ये कर्नाटकचा झारखंडकडून दारुण पराभव झाला. विराट सिंहमुळे झारखंडने हा विजय मिळवला. त्याने तुफानी अर्धशतक ठोकून टीमला विजय मिळवून दिला. (PTI)
विराट सिंहने कर्नाटक विरुद्ध 34 चेंडूत नाबाद 60 धावा केल्या. त्याने 3 सिक्स आणि पाच चौकार मारले. त्याच्यासोबत कॅप्टन अनुकूल रॉयने सुद्धा नाबाद 54 धावा केल्या. (PTI)
कर्नाटकने पहिली बॅटिंग केली. त्यांनी 20 ओव्हर्समध्ये 174 धावा केल्या. प्रत्युत्तरात झारखंडने 19.1 ओव्हरमध्ये विजयी लक्ष्य गाठलं. झारखंडने चार सामन्यात मिळवलेला हा दुसरा विजय आहे. झारखंडला मागच्या सामन्यात बंगाल आणि त्याआधी राजस्थानकडून पराभव स्वीकारावा लागलेला. (PTI)
सैयद मुश्ताक अली ट्रॉफी मध्ये दुसऱ्याएका सामन्यात पंजाबने मजबूत मानल्या जाणाऱ्या तामिळनाडू टीमला हरवलं. पंजाबने फक्त पाच रन्सनी हा सामना जिंकला.(PTI)
कार्तिक चड्ढा पंजाबच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने 30 रन्स देऊन तीन विकेट काढले. कृष भगत आणि सुखदीप बाजवाने 2-2 विकेट काढले. (PTI)