
हार्ट अटॅकचा उल्लेख होताच सर्वप्रथम छातीत तीव्र वेदना हे लक्षण समोर येते, जे हृदयविकाराच्या झटक्याचे प्राथमिक संकेत आहे. याशिवाय इतरही काही लक्षणं असतात, परंतु काही लक्षणं अशी असतात की, आपण त्यांचा विचारही करत नाही, तरीही ती हार्ट अटॅकशी संबंधित असू शकतात. विशेष म्हणजे, अशी काही लक्षणं चेहऱ्यावरही दिसून येतात.

हार्ट अटॅक येण्यापूर्वी चेहऱ्यावर काही विशिष्ट संकेत दिसतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका आहे की नाही, हे ओळखता येऊ शकते. तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, ही लक्षणं नेमकी कशी दिसतात? चला, जाणून घेऊया हार्ट अटॅकची चेहऱ्यावरील कोणती लक्षणं आपल्याला सावध करू शकतात.

हे तुम्हाला विचित्र वाटेल, पण दातदुखी हृदयविकाराच्या झटक्याने होऊ शकते. जरी दातदुखी काही समस्येमुळे होऊ शकते, पण जर ही वेदना कायम राहिली तर उशीर न करता डॉक्टरकडे जा. हे हृदयविकाराचं लक्षण असू शकतं.

अनेकांना हिरड्यांमधून रक्त येण्याची समस्या असते. कधीकधी ती सामान्य असू शकते, पण कधीकधी ती हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण देखील असू शकतं. जर तुम्हाला हिरड्यांमधून सतत रक्त येण्याची समस्या येत असेल तर ताबडतोब त्याकडे लक्ष द्या आणि डॉक्टरांचा सल्ला घेऊन वेळीच उपचार घ्या.

पोटाच्या समस्यांमुळे तोंडात अल्सर होतात असं म्हटलं जातं, पण कधीकधी हे अल्सर हृदयविकाराच्या झटक्याचं लक्षण असू शकतात. डॉक्टरांच्या मते, तोंडात अल्सरची समस्या हृदयविकाराच्या आधी उद्भवू शकते. त्यामुळे तोंडात अल्सर होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नका.

बऱ्याचदा आपल्याला जबड्यात वेदना होऊ लागतात, ते सामान्य मानण्याची चूक आपण करतो, परंतु हृदयविकाराच्या आधीही तुम्हाला जबड्यात वेदना होण्याची तक्रार येऊ शकते. जर तुम्हाला जबड्यात वेदना होत असतील तर वेळेवर डॉक्टरकडे जा. (डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)