
भारत आणि पाकिस्तानमधील सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी करणारा भारत अवघ्या 119 धावात ऑल आऊट झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांंनी दमदार प्रदर्शन केलं. त्यानंतर भारताची भिस्त गोलंदाजांवर अवलंबून होती.

भारतीय गोलंदाजांनी आपली सर्व ताकद लावलेली दिसून आली. अर्शदीप सिंह, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह यांनी टिच्चून मारा केला.

भारताला पहिलं यश जसप्रीत बुमराह याने मिळवून दिलं. बाबर आझम याला बुमराहने आऊट करत पाकिस्तानला पहिला धक्का दिला. मात्र याच ओव्हरमध्ये मोहम्मद रिझवान याचा शिवम दुबे याने सोपा झेल सोडला.

मोहम्मद रिझवान याने 31 धावांची खेळी केली, बुमराह यानेत त्याला नंतर बोल्ड केलं. पण जर तो आणखी काहीवेळ मैदानावर असता तर सामन्याचं चित्र त्याने पालटलं असतं.

शिवम दुबे याने आयपीएलमध्ये मोठे हिट मारत निवडकर्त्यांचं लक्ष आपल्याकडे वेधलं. मात्र त्याची वर्ल्ड कपमध्ये निवड झाल्यावर काही खास कामगिरी राहिली नाही. पाकिस्तानविरूद्धही दुबे याला संधी होती मात्र 3 धावाच करता आल्या. आगामी सामन्यांमध्ये त्याच्याकडून अपेक्षा असणार आहेत.