AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्याच्या आरोग्य विभागात महाघोटाळा, नक्की कुणाचे खिसे भरले? मनसेने सर्वच सांगितलं

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी महाराष्ट्र आरोग्य विभागावर १० लाखांचे एक्स-रे मशीन ६१ लाखांना खरेदी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या काळातील या कथित भ्रष्टाचाराची सविस्तर माहिती आणि निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याचा अहवाल यावेळी देण्यात आला आहे

राज्याच्या आरोग्य विभागात महाघोटाळा, नक्की कुणाचे खिसे भरले? मनसेने सर्वच सांगितलं
health department maharashtra
| Updated on: Mar 05, 2026 | 11:10 AM
Share

महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी प्राधिकरण हे सध्या मोठ्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी आरोग्य विभागाच्या निविदा प्रक्रियेत (Tenders) कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. याप्रकरणी तत्कालीन आरोग्य मंत्र्यांच्या कार्यकाळातील या व्यवहारांची चौकशी करा, अशी मागणी संदीप देशपांडे यांनी केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

आरोग्य विभागाने रुग्णांसाठी पोर्टेबल एक्स-रे मशीन खरेदी करण्यासाठी ‘जी इ एम २०२४’ (GeM 2024) अंतर्गत निविदा काढली होती. या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे. ज्या डिजिटल पोर्टेबल एक्स-रे मशीनची बाजारभावानुसार किंवा सरकारी पोर्टलवरील किंमत साधारण १० लाख रुपये आहे, तीच मशीन महाराष्ट्र शासनाने प्रति नग ६१ लाख २० हजार रुपयांना खरेदी केली आहे. एकूण ८० नग मशीनची खरेदी करताना शासनाने ६ पट अधिक दर मोजले. यामुळे सरकारी तिजोरीचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे, असा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे.

या निविदा प्रक्रियेत श्रद्धा डिस्ट्रीब्यूटर आणि लक्ष्मी सर्जिकल या दोन कंपन्या पात्र ठरल्या होत्या. ज्यापैकी श्रद्धा डिस्ट्रीब्यूटरला हे कंत्राट मिळाले. मात्र, मूळ उत्पादक कंपन्यांना डावलून केवळ वितरकांना झुकते माप का दिले, असा सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.

चिनी उत्पादनांचा घुसखोर वापर?

एक्स-रे मशीनसोबतच ‘मिडी एक्स डिव्हाइस प्रायव्हेट लिमिटेड’ (Midi X Device Pvt Ltd) या कंपनीला यावेळी कंत्राट देण्यात आले. भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सीमावर्ती देशांतील (उदा. चीन) उत्पादनांसाठी विशेष नोंदणी आवश्यक आहे. तसेच चिनी उत्पादने टाळण्याचे शासनाचे धोरण असतानाही या कंपनीकडून चिनी बनावटीच्या वस्तू घेतल्या जात असल्याचा आरोप आहे. उत्पादन करणाऱ्या स्वदेशी कंपन्यांना डिस्कॉलिफाय करून, केवळ विक्री करणाऱ्या कंपन्यांना क्वालिफाय कसे केले जाते, असा तांत्रिक प्रश्नही संदीप देशपांडे यांनी विचारला आहे.

संदीप देशपांडे यांनी थेट तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या कार्यकाळातील या खरेदीवर बोट ठेवले आहे. या भ्रष्टाचारामागे कोणती राजकीय शक्ती आहे? श्रद्धा डिस्ट्रीब्यूटरचे मालक आणि कोणाचे लागेबांधे आहेत? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच गेल्या ९ फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटूनही अद्याप लेखी उत्तर न मिळाल्याने त्यांनी संताप व्यक्त केला. एकीकडे आरोग्यासाठी बजेट नाही असे सांगितले जाते आणि दुसरीकडे ६ पट जास्त किंमतीने खरेदी केली जाते. हा लोकांच्या पैशांचा अपव्यय आहे. याची चौकशी आर्थिक गुन्हे शाखेकडून (EOW) व्हावी, अन्यथा आम्ही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे संदीप देशपांडे म्हणाले.

पुढील पाऊल काय?

यावेळी संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्याकडे अशा १४ यंत्रसामग्री खरेदीचे पुरावे आहेत. पुढील काही दिवस दररोज एक याप्रमाणे आरोग्य विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे ते माध्यमांसमोर मांडणार आहेत. आरोग्य विभागाच्या या कारभारामुळे आता राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडण्याची शक्यता आहे.

Follow Us
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा
भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण... मनसेचा थेट इशारा काय?
MNS | भाजप कार्यकर्त्यांना येऊ द्या, पण जाताना त्यांच्यासाठी ॲम्बुलन्स पाठवावी!; मनसेचा थेट इशारा
अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे...
Sushma Andhare on Bawankule | सुषमा अंधारेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल; रंग बदलू फडणवीस! म्हणत बावनकुळे अन् मोदींनाही घेरलं
माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
BJP Protest Against Amit Thackeray : माहिममध्ये भाजप युवा मोर्चाचे अमित ठाकरेंविरोधात आंदोलन
50 लाखांच्या फॉर्च्युनर, HSRP प्लेट नाही! पडळकरांच्या गाड्यांवरून वाद
Gopichand Padalkar | 50 लाखांच्या फॉर्च्युनर, पण HSRP प्लेट नाही! गोपीचंद पडळकरांच्या गाड्यांवरून नवा वाद; व्हिडीओ होतोय व्हायरल
सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सौरभ दास यांची घोषणा
CJP Protest | सीजेपीचा 5 सप्टेंबरचा दिल्ली मोर्चा अखेर रद्द! सुप्रीम कोर्टातील सुनावणीनंतर सौरभ दास यांची मोठी घोषणा
बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला...
Mumbai Hospital | बुरखा घातलेल्या महिलांना कूपर रुग्णालयाने प्रवेश नाकारला? व्हिडीओ व्हायरल; प्रशासन म्हणतं, रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न...
देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? हाकेंचा थेट सवाल
Laxman Hake | देवेंद्र फडणवीस फक्त एका जातीचे मुख्यमंत्री आहेत का? लक्ष्मण हाकेंचा थेट सवाल; ओबीसी आरक्षणावरून घमासान
महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?
Supriya Sule | महागाई-बेरोजगारी-भ्रष्टाचार… राज्य चालवायला सरकार अपयशी ठरलंय का?; सुप्रिया सुळे यांचा सरकारला थेट सवाल