
टी- 20 वर्ल्ड कपला सुरूवात झाली असून पहिला सामना अमेरिका वि. कॅनडामध्ये पार पडलाय. अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन संघांकडे यजमानपद आहे.

टीम इंडियाचा स्टार खेळाडू युवराज सिंह यंदाच्या वर्ल्ड कपचाब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. आयसीसीने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती.

आयसीसीची 2013 नंतर एकही ट्रॉफी टीम इंडियाला जिंकता आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक स्पर्धेमध्ये टीम इंडियावर याचा काहीसा दबाव पाहायला मिळतो. यावर युवराजने काय म्हटलं आहे जाणून घ्या.

मला विश्वास आहे की टीम इंडियाकडे मोठ्या स्पर्धा जिंकण्याचा आत्मविश्वास आहे. भारतीय संघाने स्वत:वर विश्वास ठेवला आणि पूर्ण क्षमतेने खेळ केला तर ते विजेतेपद मिळवू शकतात, असं युवराज सिंह याने म्हटलं आहे. त्यासोबतच युवराजने फायनल गाठणाऱ्या टीमची नावे घेतली आहेत.

यंदाच्या वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया, वेस्ट इंडिज किंवा पाकिस्तान फायनलध्ये प्रवेश मिळवू शकतात, असं युवराज सिंहने म्हटलं आहे. भारताचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंड संघासोबत असणार आहे. त्यानंतर पाकिस्तानसोबत 9 जूनला हा सामना होणार आहे.