T20 WC 2026 : सुपर-8 मध्ये टीम्सचे पॉइंट बरोबरीत असतील तर सेमीफायनल प्रवेशासाठी टाय-ब्रेकरचा रुल, त्यात काय पाहिलं जाणार?
T20 World Cup 2026 : आयसीसी मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये सुपर-8 चा पहिला सामना पाकिस्तान आणि न्यूझीलंडमध्ये होणार होता. पण एकही चेंडू न टाकता हा सामना रद्द झाला.

श्रीलंकेत ग्रुप-2 चे सर्व सामने होणार आहेत. अशावेळी फॅन्स आणि टीमचं टेन्शन वाढलं आहे. एका मोठा प्रश्न आहे, जर सुपर-8 चे सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर सेमीफायनलमध्ये कोण पोहोचणार?. अशा स्थितीसाठी आयसीसीचे स्पष्ट दिशा-निर्देश आहेत. (Getty Images)

सुपर-8 राऊंडमध्ये एका ग्रुपमध्ये सर्व टीम्सचे बरोबरीत पॉइंट राहिलेत तर टाय-ब्रेकरचे नियम लागू होतील.सर्व प्रथम ग्रुप स्टेजमधील विजयाची संख्या पाहिली जाईल. तिथे बरोबरी असेल, तर नेट रन रेट, मग हेडू टू हेड निकाल आणि मग अखेरीस टुर्नामेंट सुरु होण्याआधीची आयसीसी टी20 रँकिंग पाहिली जाईल. (PTI)

दोन्ही टीम्सचे आकडे बरोबरीत असतील, तर टाय-ब्रेकर रुल लावला जाईल. एका ग्रुपमधील सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर विजयाची संख्या 0 असेल. चारही टीम्सचा नेट रनरेट 0.000 असेल. त्याशिवाय हेड टू हेड परिणामही शून्यच असेल. (X)

अशा स्थितीत टुर्नामेंटच्या आधीची रँकिंग खूप महत्वाची असेल. 6 फेब्रुवारी 2026 पर्यंतच्या टी20 रँकिंगला आधार बनवलं जाईल असं आयसीसीने स्पष्ट केलय. (PTI)

ग्रुप 2 मध्ये सर्व सामने पावसामुळे रद्द झाले तर इंग्लंड (रँक3) आणि न्यूझीलंड (रँक 4) सेमीफायनलमध्ये पोहोचतील. पाकिस्तान (रँक 6) आणि यजमान श्रीलंका (रँक 8) टुर्नामेंटमधून बाहेर होतील. ग्रुप 1 मधून भारत (रँक 1), दक्षिण आफ्रिका (रँक 5) सेमीफायनलमध्ये पोहोचतील.