AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

चंद्रशेखर बावनकुळे खरंच मुख्यमंत्री होणार? भुजबळांनी नेमकं….त्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा!

जय राऊत यांनी सध्या चालू असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत मंत्री होऊ शकतात, असे म्हटले जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे खरंच मुख्यमंत्री होणार? भुजबळांनी नेमकं....त्या उत्तराची राजकीय वर्तुळात चर्चा!
devendra fadnavis and chandrashekhar bawankule and chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 11, 2026 | 5:21 PM
Share

Chhagan Bhujbal : राज्याच्या राजकारणात नेहमीच काहीतरी घडत असतं. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष सत्ताधारी एनडीएच्या बाजून उभा राहू शकतो, असा दावा केला जातोय. हा दावा मात्र शरद पवार यांच्या पक्षातील नेत्यांनी फेटाळला आहे. आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लवकरच चंद्रशेखर बावनकुळे हे राज्याचे मुख्यमंत्री होणार आहेत, असा दावा केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे भाजपाचे वरिष्ठ नेते असून विद्यमान महसूलमंत्री आहेत. दरम्यान, राऊत यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आता याच दाव्यावर सध्या महायुतीचा भाग असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गट) पक्षाचे वरिष्ठ नेते तथा मंत्री छगन भुजबळ यांनी मोठे विधान केले आहे.

शरद पवार एनडीएमध्ये येतील…

छगन भुजबळ आज नाशिकच्या दौऱ्याव होते. यावेळी भुजबळ यांना शरद पवार यांच्या राष्ट्रवादीविषयी विचारण्यात आले. पवारांचा गट एनडीएत येणार का? असे विचारले असता याचे उत्तर त्यांनी नाही असे दिले. शरद पवार एनडीएमध्ये येतील असे मला अजिबात वाटत नाही. त्या दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यालय जवळच होते. त्यामुळे ते एकनाथ शिंदे यांच्या केबिनला गेले. ते अनेक वर्षे मुख्यमंत्री होते आणि केंद्रातही मंत्री होते. त्यामुळे त्यांच्यासाठी सगळीकडे रेड कार्पेट असतो, असे भुजबळ म्हणाले.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले होते?

संजय राऊत यांनी सध्या चालू असलेल्या मुख्यमंत्रिपदाच्या चर्चेवर भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे लवकरच दिल्लीत मंत्री होऊ शकतात, असे म्हटले जात आहे. तसे शक्य झाले तर चंद्रशेखर बावनकुळे हे मुख्यमंत्री होऊ शकतील. एकनाथ शिंदे हे पुन्हा अजिबात मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. गिरीश महाजन यांचाही रेकॉर्ड खूप खराब आहे, असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

भुजबळ यांनी काय प्रतिक्रिया दिली?

यावरच भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केले आहे. मी काही जोतिषी नाही. त्यामुळे याबाबत मला काही माहिती नाही, असे सांगितले. त्यांनी याबाबत थेट उत्तर दिलेले नाही. त्यामुळे राऊतांची भविष्यवाणी खरी होणार का? असा सवाल उपस्थित केला जातोय.

Follow Us
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक; आई-वडिलांचा संताप अनावर...
दिल्लीतील आंदोलनात अभिजीत दीपकेला अटक, आई-वडिलांचा संताप अनावर; थेट म्हणाले...
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं
CJP आंदोलनाच्या मागे कोणाचा हात? नितीन नबीन यांनी नावाचं सांगितलं, म्हणाले...
विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; दिपके, सौरभ दास अन्.....
CJP Protest : विमान दिल्लीत उतरताच महिला पोलिसांची एंट्री; अभिजीत दिपके, सौरभ दास अन् आशुतोष रांका ताब्यात
हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात
Prakash Ambedkar : हे हिटलरशाहीचं सरकार...; प्रकाश आंबेडकर यांचा केंद्र सरकारवर घणाघात, पुढे म्हणाले...
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या....
....हे खात्रीने सांगतो, राहुल गांधींचं मोठं विधान; दिल्लीच्या राजकारणात खळबळ
अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं; मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन्
Abhijeet Dipke At Delhi : मुंबईतून दिल्लीला पोहोचले अन् विमानातच पोलिसांची कारवाई; अभिजीत दिपकेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं
56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? राऊतांचा मोदी-शहांवर हल्लाबोल
Sanjay Raut : 56 इंच छातीवाले देशातील तरुणांना घाबरले? संजय राऊतांचा मोदी-शहांवर थेट हल्लाबोल
भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान
Chirag Paswan : भारतीय तरुणांना कोणीही... चिराग पासवान यांचं मोठं विधान; रेल्वे-मेट्रो बंदीवरून नेमकं काय म्हणाले?
काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही....
Delhi CJP Protester : काहीही झालं तरी आंदोलन करणार; 500 हून अधिक आंदोलक ताब्यात, तरीही CJP कार्यकर्ते...
आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?
Rohit Pawar Speech : आज कदाचित शेवटची सभा असू शकते; रोहित पवार असं का म्हणाले?