AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्वात मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, दिल्लीत… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

जर देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्रिमंडळात गेले, तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपद चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे येईल, असा दावा बड्या नेत्याने केला आहे. . संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी संभाव्य केंद्रीय मंत्रिमंडळ फेरबदलाच्या पार्श्वभूमीवर हे विधान आले आहे. एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, असेही या नेत्याने स्पष्ट केले, ज्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

सर्वात मोठी बातमी ! चंद्रशेखर बावनकुळे मुख्यमंत्री होणार, दिल्लीत... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
| Updated on: Jul 11, 2026 | 10:50 AM
Share

संसदेचे पावसाळी अधिवेशन लवकरत सुरू होणार आहे. मात्र त्यापूर्वी केंद्रीय मंत्रीमंडळात फेरबदल होऊ शकतात, विस्तार होऊ शकतात आणि काही नाव चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील देखील काही नावांची चर्चा आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलले देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात अर्थमंत्री केलं जाऊ शकतं अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे खळबळ माजली आहे. फडणवीस केंद्रात गेलेच मंत्री म्हणून तर राज्याची सूत्र ही चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सोपवली जाऊ शकतात, असा मोठा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

तर 100 टक्के बावनकुळे यांचा होणार विचार

तुम्हाला वाटत असेल मी आणखी कोणाचं नाव घेईन, तर मला जे चित्र दिसतंय त्यानुसार, विदर्भातले चंद्रशेखर बावनकुळे हे फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री पदासाठी योग्य नेते मला दिसतात. सर्वांशी योग्य संवाद ठेवणारे, सांभाळून घेणारे असे बावनकुळे आहेत. एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, अजिबात नाही, असं राऊत स्पष्टपणे म्हणाले. गिरीश महाजन यांचा रेकॉर्ड अत्यंत खराब आहे. त्यामुळे जर फडणवीस केंद्रात गेले तर 100 टक्के बावनकुळे यांचा विचार आणि शिफार, स्वत: देवेंद्र फडणवीसचं करतील, हे माझं आकलन आहे, असं राऊत यांनी नमूद केलं.

जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल..

राज्याच्या मुख्यमंत्रीपदी येणाऱ्या योग्य व्यक्तीला नेहमीच शुभेच्छा दिल्या पाहिजेत, जो राज्याचं हित पाहील. जो राज्य योग्य दिशेने पुढ घेऊन जाईल आणि जो राज्याचा स्वाभिमान टिकवेल, अशी कोणीही व्यक्ती असेल, तर त्याला शुभेच्छा देणं हे आमचं कर्तव्य आहे, असं राऊत म्हणाले.

मी तुम्हाला माझा अंदाज आणि माझं आकलन सांगितलं. त्यांच्या पक्षातले निर्णय घेणारे आम्ही नाहीयोत, पण असं घडू शकेल किंवा असं घडण्याची शक्यता आहे, असं राऊतांनी सांगितलं.

संजय राऊत यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून अनेक शक्यता व्यक्त होत आहेत. याच पार्श्वभूमीवर घडामोडींना वेग आला असून दिल्लीत काय घडतं, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे