
टीम इंडिया आणि इंग्लंड यांच्यातील सेमी फायनल सामन्यााचा टॉस पावसामुळे लांबला होता. टॉस झाला असून इंग्लंड संघाने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

टीम इंडिया आणि इंग्लंडमधील सामना पावसामुळे थांबला होता. आता सूर्यप्रकाश आला असून मैदानातून आता कव्हर हटवण्यात आले आहेत. ऊन आल्यामुळे दोन्ही संघाचे खेळाडू मैदानात उतरले आहेत.

रोहित शर्माही मैदानात उतरल्यावर त्यावेळी मुंबई इंडियन्सचा माजी खेळाडू पोलार्ड तिथे आला. दोघेही पिचबद्दल चर्चा करताना दिसले. पोलार्डचं घरगुती मैदान असल्याने त्याने आपल्या जुन्या मित्राला आणि कॅप्टनला मार्गदर्शन करताना काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या.

रोहित शर्मा आणि पोलार्ड दोघेही मुंबई इंडियन्सचे मुख्य खेळाडू होते. रोहित कॅप्टन असताना पोलार्ड संघाचा बालेकिल्ला म्हणून त्याच्याकडे पाहिलं जायचं.

टीम इंडिया आणि इंग्लंड सामना पावसान रद्द झाला तर टीम इंडिया फायनलमध्ये जाणार आहे. कारण दुसऱ्या सेमी फायनल सामन्याला कोणताही राखीव दिवस ठेवलेला नाही.