दयाबेनचं थक्क करणारं ट्रान्सफॉर्मेशन; पहिल्यांदाच दिसली मुलगी

अभिनेत्री दिशा वकानीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. दिशाला पुन्हा एकदा दयाबेनच्या भूमिकेत पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. परंतु ती तिच्या वैयक्तिक आयुष्यात व्यस्त झाली आहे. नुकताच दिशाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. यामध्ये तिचं ट्रान्सफॉर्मेशन पहायला मिळत आहे.

| Updated on: Jul 04, 2025 | 1:49 PM
1 / 5
'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका गेल्या 17 वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दिशा वकानीने बाळंतपणासाठी ब्रेक घेतला होता. परंतु त्यानंतर ती मालिकेत परतलीच नाही.

2 / 5
2017 मध्ये पहिल्या प्रेग्नंसीदरम्यान दिशा रजेवर गेली होती. तेव्हापासून ती छोट्या पडद्यापासून दूरच आहे. दिशा मालिकेत कधी परतणार, असा प्रश्न वारंवार चाहत्यांकडून विचारला जातो. परंतु निर्मात्यांकडे आजही त्याचं ठोस उत्तर नाही. दिशा सोशल मीडियावरही सक्रिय नाही.

3 / 5
नुकतेच दिशाचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोन मुलांची आई झाल्यानंतर दिशा पूर्णपणे बदलली आहे. ती तिच्या गृहस्थ जीवनात व्यस्त झाली आहे. या फोटोंमध्ये दिशा पारंपरिक लूकमध्ये पहायला मिळतेय.

4 / 5
दिशाने गुजराती स्टाइलमध्ये साडी नेसली आहे. तिचा हा फोटो एखाद्या कार्यक्रमातील असल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये दिशासोबत एक छोटी मुलगीसुद्धा दिसून येत आहे. दिशाने त्या मुलीचा हात आपल्या हातात पकडला आहे. त्यामुळे ती दिशाचीच मुलगी आहे की दुसरी कोणी, असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे.

5 / 5
गेल्या काही वर्षांत दिशाच्या लूकमध्ये बराच बदल झाला आहे. तिचं ट्रान्सफॉर्मेशन या फोटोंमध्ये स्पष्ट दिसून येत आहे. दिशाची ही नवी झलक पाहून चाहते खूप खुश झाले आहेत.