Munmun Dutta Transformation: स्लिम फिगर -क्लासी अंदाज, 21 वर्षात ‘तारक मेहता..’ फेम ‘बबीता जी’चं हटके ट्रांसफॉर्मेशन
Munmun Dutta Transformation: 'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतील कलाकार आजही कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. यामध्ये अव्वल स्थानी अभिनेत्री मुनमून दत्ता म्हणजे 'बबीता जी' आहे. सध्या अभिनेत्रीचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'तारक मेहता का उल्टा चष्मा' मालिकेतून घरा-घरात पोहोचलेली अभिनेत्री मुनमून दत्ता गेल्या 18 वर्षांपासून मालिकेत काम केलं आहे. अभिनेत्री कायम कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.
पण गेल्या काही वर्षांपासून मुनमून दत्ता हिचा लूक फार बदलेला वाटत आहे. आता मुनमून हिने 2005 आणि 2006 सालचे काही फोटो पोस्ट केले आहेत. फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला देखील मोठा धक्का बसेल.
20 - 21 वर्ष जुन्या फोटोमध्ये मुनमून स्लिम आणि फिट दिसत आहे. यामध्ये काही फोटो तिच्या मॉडेलींग दरम्यानचे आहेत. जेव्हा अभिनेत्रीने तिच्या करियरची सुरुवात केली होती. आजही अभिनेत्री तितकीच ग्लॅमरस दिसते.
सोशल मीडियावर सध्या मुनमून हिचे फोटो व्हायरल होत आहे. अनेकांना अभिनेत्रीचे फोटो आवडले आहेत. फोटोंमध्ये मुनमून हिचं ट्रांसफॉर्मेशन कमाल दिसत आहे. पूर्वी प्रमाणे मुनमून तिच्या फॅशनमुळे चर्चेत असते.
मुनमून दत्ता सोशल मीडियावर कायम सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करत असते.