
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम बबिताजी म्हणजेच अभिनेत्री मुनमुन हिच्याचाहत्यांची संख्या कमी नाही. पण तिने अद्याप लग्न केलं नाही. अभिनेता अरमान कोहली याच्यासोबत अभिनेत्री अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होती.

मुनमुन दत्ताचे अभिनेता अरमान कोहलीसोबत अफेअर होतं. पण दोघांचं नातं लग्नापर्यंत पोहोचलं नाही. अखेर अभिनेत्रीने ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघेही एकमेकांवर खूप प्रेम करत होते, पण एक वेळ अशी आली की अरमान मुनमुनला मारहाण करू लागला.

व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी अरमान कोहली आणि मुनमुन दत्ता यांच्यात खूप भांडण झाल्याचं म्हटलं जातं. भांडणानंतर अरमानने मुनमुनला मारहाण करण्यास सुरुवात केली, त्यानंतर मुनमुनने अरमान कोहलीविरुद्ध तक्रार दाखल केली.

अरमान कोहलीचे वाईट वर्तन पाहून मुनमुन पुरुषांचा द्वेष करू लागली. सध्या मुनमुन दत्ता एकटीच आयुष्य जगत आहे. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम सक्रिय असते.