
तब्बू आज ५१ वर्षांची आहे. पण तरी देखील अभिनेत्री आज अविवाहित आहे. तर आज जाणून घेवून अभिनेत्रीच्या खासगी आयुष्याबद्दल. रिपोर्टनुसार, बॉलिवूडमध्ये पदार्पण केल्यानंतर तब्बूचं नाव अभिनेता संजय कपूर याच्यासोबत जोडण्यात आलं. 'प्रेम' सिनेमाच्या शुटिंग दरम्यान दोघांनी डेट करण्यास सुरुवात केली.

संजय कपूर आणि तब्बू यांचं नातं मात्र फार काळ टिकू शकलं नाही. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. नात्याबद्दल अभिनेता एका मुलाखतीत म्हणाला, 'तेव्हा मी तब्बूला डेट करत होतो. पण ब्रेकअपनंतर आम्ही दोघांनी बोलणं देखील बंद केलं...'

संजय कपूर याच्या नंतर अभिनेत्रीचं नाव प्रसिद्ध दिग्दर्शक साजिद नाडियाडवाला याच्यासोबत जोडण्यात आलं. रिपोर्टनुसार, पत्नी दिव्या भारती हिच्या निधनानंतर साजिद याने तब्बूला डेट करण्यास सुरुवात केली. पत्नीच्या निधनानंतर स्वतःला सावरण्यासाठी तब्बूने साजिद याची मदत केली.

याच दरम्यान साजिद आणि तब्बू एकमेकांच्या जवळ आले. साजिद आणि तब्बू यांनी त्यांचं नातं गुपित ठेवलं होतं. पण जेव्हा शेवटी दोघांच्या नात्याचं सत्य समोर आलं तेव्हा मात्र उशीर झाला होता. काही दिवस डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

साजिद याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर अभिनेत्रीच्या आयुष्यात प्रसिद्ध अभिनेता नागार्जुन याची एन्ट्री झाली. नागार्जुन याच्यासोबत अभिनेत्री जवळपास १० वर्ष रिलेशनशिपमध्ये होती. तब्बूला डेट करत असताना नागार्जुन विवाहित होता.

१० वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. १० वर्ष डेट केल्यानंतर नागार्जुनच्या लक्षात आलं की, तो पत्नीला घटस्फोट देवू शकत नाही. म्हणून तब्बूला डेट केल्यानंतर स्वतः नागार्जुन अभिनेत्रीपासून विभक्त झाला.