मुंबईच्या ताज हॉटेलचा सातासमुद्रापार डंका, जगातील टॉप हॉटेल्समध्ये कितवं स्थान पटकवलं?
मुंबईच्या ताज हॉटेलचा सातासमुद्रापार डंका पहायला मिळत आहे. जगातील टॉप हॉटेल्समध्ये ताज हॉटेलने स्थान मिळवलं आहे. यानंतर ताज हॉटेलची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

स्वप्न नगरी मुंबई फिरण्याचं स्वप्न अनेकांचं असतं. मुंबईत पहिल्यांदा येणारा व्यक्ती ताज हॉटेलजवळ जाऊन फोटो काढण्याचा मोह टाळत नाही. या ताज हॉटेलची सातासमुद्रपार चर्चा होत आहे.
मुंबईत पहिल्यांदा येणारा परदेशी पर्यटक ताज हॉटेलमध्ये जाऊन येतोच. या हॉटेलचं लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत कौतुक करत असतात. या हॉटेलने जगातील सर्वोत्तम हॉटेल्समध्ये स्थान पटकवलं आहे.
जगातील सर्वोत्तम हॉटेल्सच्या यादीत ताज हॉटेलने 30 व्या क्रमांकांवर स्थान मिळवलं आहे. जगातील टॉप 50 हॉटेल्सच्या यादीत ताज हॉटेलने स्थान मिळवलं आहे.
हॉटेलची रचना हटके आहे. त्यात राजपूत,मूरिश आणि ओरिंटल शैली दिसून येते. तसेच हॉटेलच्या घुमटमध्ये आयफेल टॉवरसारखा स्टीलचा वापर करण्यात आला आहे. ताज हॉटेल हे 123 वर्षापूर्वी बांधले गेले.
मागील वर्षी ताज हॉटेलने 38 वे स्थान पटकवले होते. यंदा हॉटेलच्या कामगिरीत सुधारणा झाली आहे. ताज हॉटेल्सने यंदा जगात 30 वे स्थान मिळवले आहे.