
बॉलिवूड अभिनेत्री पूजा हेगडे परिपूर्ण फॅशन आयकॉनिस्ट आहे. आपल्या सोशल मीडियावर कायम सक्रिय असलेली पाहायला मिळते. सोशल मीडियावर पूजा फेस्टिव्ह लुकपासून ते ट्रेंडी आऊटफीट पर्यंतच्या अनेक फोटो पोस्ट करत असते. पुजाने नुकतंच तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर साडीतील फोटो शेअर केले आहेत.

यामध्ये पूजाची पेस्टल हिरवी बॉर्डर असलेली साडी घातली आहे . यावर पांढरे धागे आणि सिल्व्हर मिररचे नक्षीकाम केलेलं होत. त्यावर पूजाने पांढऱ्या रंगाच्या ब्रॅलेट स्टाइल ब्लाउज घातला आहे.यावर तिने हातात पेस्टल रंगाचे ब्रेसलेट घेतले होते.

ब्युटी अँड द बीस्ट,हे कॅप्शन पूजाने तिच्या कॅप्शनमध्ये बीस्ट या लवकरच प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटाच्या संदर्भाने दिले आहे. तिने साडीतील पेहरावावर हलकासा मेकअप केला आहे.यामध्ये न्यूड आयशॉडो, ब्लॅक आयलाईन, न्यूड लिपस्टिक वापरण्यात आली आहे.

अभिनेता थलपती विजय सोबतच्या बीस्ट चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आहे