थंडीत रोज अंघोळ करणं टाळता? उस में क्या?; अहो, त्यामुळे तुमचा फायदा…

| Updated on: Feb 04, 2023 | 8:30 AM

हिवाळ्यात रोज आंघोळ करायला बऱ्याच जणांना आवडत नाही, हे तर कॉमन आहे. पण तुम्हाला माहित आहे का याचेही अनेक फायदे आहेत.

1 / 5
हिवाळ्यात थंडी वाजणे आणि आळस यामुळे बहुतेक लोक रोज आंघोळ करणे टाळतात. पण तुम्हाला माहित आहे का, की रोज आंघोळ न करण्याचे अनेक फायदे आहेत. हिवाळ्यात आंघोळ न केल्याने लाज वाटण्याऐवजी जाणून घ्या हे फायदे.

2 / 5
त्वचा स्वतःला स्वच्छ ठेवण्यास सक्षम :  अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की आपली त्वचा स्वतःला स्वच्छ ठेवण्यास सक्षम असते. जो माणूस कमी बाहेर पडतो किंवा ज्यांचा धूळ, प्रदूषणाशी संबंध येत नाही त्यांना रोज आंघोळ करायची गरज नाही.

3 / 5
त्वचेवर कोरडेपणा : हिवाळ्यात हवेत आर्द्रतेची कमतरता असते आणि त्यामुळे त्वचेचे मॉयश्चरायझरही कमी होऊ लागते. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, गरम पाण्याचा वापर केल्याने त्वचेतील आर्द्रता कमी होते आणि त्वचा कोरडी पडू लागते.

4 / 5
चांगले बॅक्टेरिया मारले जातात : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की त्वचेमध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया त्वचेला संसर्ग आणि विषारी पदार्थांपासून वाचवतात. पण जर तुम्ही रोज गरम पाण्याने आंघोळ केली तर चांगले बॅक्टेरिया मरू शकतात.

5 / 5
 त्वचेवर खाज सुटणे आणि पुरळ उठणे : दररोज गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेला खाज सुटण्याची आणि रॅशेस किंवा पुरळ उठण्याची समस्या निर्माण होऊ शकते. थंडीमुळे लोकांना गरम पाण्याने आंघोळ करायला आवडते पण ते स्किन बर्नचे कारण बनू शकते.